Wednesday, 3 July 2019

डॉक्टर विरोधात हल्ला करण्याऐवजी व्यवस्थेविरुद्ध नागरिकांनी हल्लाबोल करावा

'डॉक्टर दिना' निम्मित रुग्णमित्र आणि कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालय प्रबोधिनी, कुर्ला तर्फे कृतज्ञता सोहळा व वैद्यकीय सेवेचे मार्गदर्शन आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना अनिल गलगली (पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते) यांनी प्रतिपादन केले की डॉक्टर विरोधात हल्ला करण्याऐवजी व्यवस्थेविरुद्ध नागरिकांनी हल्लाबोल करण्याची आवश्यकता आहे.


अनिल गलगली यांनी वस्तुस्थितीवर बोलताना सांगितले की आज महापालिका असो शासकीय रुग्णालय सर्वत्र रुग्ण अधिक आणि अधिकारी-कर्मचारी वृंदाची संख्या नगण्य आहे. अश्या परिस्थितीत शासन आणि राज्यकर्ते यांस जाब विचारला गेला पाहिजे पण दुर्दैवाने डॉक्टर मंडळींवर हल्ला केला जातो. डॉक्टर विरोधात हल्ला करण्याऐवजी व्यवस्थेविरुद्ध नागरिकांनी हल्लाबोल करण्याची आवश्यकता आहे.


डाॅ.राहुल कोल्हे( वैद्यकीय अधिकारी हिंदू सभा व कोहिनूर रूग्णालय) म्हणाले की आज डॉक्टर विपरित परिस्थितीत कार्य करतो आणि नागरिकांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करतात. डाॅ.भूषण भोरे (दंत चिकित्सक) म्हणाले की डॉक्टर आणि रुग्ण यांचे संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. डाॅ.रोहीत पांडे (केईएम हाॅस्पीटल आरएमओ व मार्ड प्रतिनिधी) म्हणाले की डॉक्टरांवर हल्ले होणे दुर्दैवी आहे यासाठी रुग्ण मित्रांचा पुढाकार महत्वाचा आहे. यावेळी रुग्ण मित्र विनोद साडविलकर व जितेंद्र तांडेल यांनी मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमास काका चव्हाण, संदिप तवसाळकर, राजेंद्र गायकवाड, जय साटेलकर, परेश मोरे, एन.एस.गोसावी, गजानन लाड, गौतम पाईकराव, आबा वाघमारे, आनंद सरतापे, विश्वनाथ सावंत, विलास धिवार, वैभव जुवेकर, प्रकाश आमटे इ.पदाधिकारी व संस्थाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन महेंद्र भास्कर यांनी केले.


No comments:

Post a Comment