Tuesday 9 July 2019

मुंबई महानगरपालिकेत अभियंताची आवश्यकता आहे 4482, प्रत्यक्षात आहेत 3513

मुंबई महानगरपालिकेत अभियंता हे पद महत्वाचे असून नागरी सुविधेपासून अंदाजपत्रक बनवित प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी करतात. आजघडीला मुंबई महानगरपालिकेत विविध पदनाम असलेल्या एकूण 4482 पदापैकी 3513 पद कार्यरत आहेत तर 969 पदे रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस नगर अभियंता कार्यालयाने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी नगर अभियंता कार्यालयाकडे विभिन्न पदावर कार्यरत असलेली मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती विचारली होती. नगर अभियंता कार्यालयाने अनिल गलगली यांस 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2018 असा त्यांच्या कार्यालयात प्राप्त अंतिम तिमाही अहवाल दिला. या अहवालाच्या अनुसार कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता, सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि उप प्रमुख अभियंताची एकूण 4482 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 969 पदे रिक्त असून 3513 पदावर अभियंते कार्यरत आहेत.  अनिल गलगली यांस जो तिमाही अहवाल दिला आहे त्यात उप प्रमुख अभियंता यांची 76 पदे असून यापैकी 46 पदे कार्यरत आहे तर 30 पदे रिक्त आहेत. कार्यकारी अभियंता यांची 288 पदे असून सद्या 214 पदावर अधिकारी कार्यरत आहेत. यात 74 पदे रिक्त आहेत. याचशिवाय सहाय्यक अभियंताची 781 पदे आहेत त्यापैकी 703 पदे कार्यरत आहेत तर 78 पदे रिक्त आहेत. दुय्यम अभियंताची 2170 पदे असून 362 पदे रिक्त आहेत. सद्या 1808 पदे कार्यरत आहेत.कनिष्ठ अभियंता ही पदे 1167 आहेत. सद्या यापैकी 425 पदे रिक्त असून 742 कनिष्ठ अभियंता कार्यरत आहेत.

अनिल गलगली यांच्या मते आज मुंबई महानगरपालिकेची वाढती व्याप्ती अभियंताची अधिक गरज असताना मंजूर पदे मोठया प्रमाणात रिक्त आहे. आज मुंबई शहर आणि उपनगरात विविध कामासाठी अभियंताची आवश्यकता असून पदे लवकरात लवकर या पदावर नियुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांस पत्र पाठविले आहे. 

No comments:

Post a Comment