Tuesday 28 April 2020

कोविड-१९ च्या उपाययोजना करिता नगरसेवक निधीतून होणाऱ्या खर्चाची माहिती संकेतस्थळावर अपलोड करावी

नगरसेवक निधीमधून कोविड- १९ च्या उपाययोजना करिता रु १० लाखापर्यंतचा खर्च करण्याबाबत जारी परिपत्रक अनुषंगाने नगरसेवक नाव, प्रभाग क्रमांक, खर्चाचा तपशील आणि एकूण खर्च ही माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याची मागणी मुंबईतील विविध 15 सामाजिक संस्थांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांसकडे केली आहे.


मुंबई महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त प्रोजेक्ट आणि सार्वजनिक आरोग्य, उपायुक्त आरोग्य, प्रमुख लेखापाल (वित्त) आणि कार्यकारी आरोग्य अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात अनिल गलगली- अथक सेवा संघ, वर्षा विद्या विलास- सद्भावना संघ, अमोल मडामे - नागरिक अधिकार मंच (NAM), नंदकिशोर तळशिलकर -अनिस, बिलाल खान -घर बचाव घर बनाओ, यासीन खान-  एरिया सभा भ समिती, रमेश कदम- एमपीजे, प्रो प्रभा तीरमारे,डॉ गजानन देसाई, डॉ कृष्णा नाईक- मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय,नायगाव शाखा,दीपक सोनावणे-भाकर फाऊंडेशन, सुजाता सावंत- आदर्श फाऊंडेशन, फकरुद्दीन शेख- धारावी रहिवाशी संघ, सीताराम शेलार- सी पी डी, सूरज भोईर- मैत्री संस्था यांनी सह्या केल्या आहेत. 


संयुक्त निवेदनात नमूद केले आहे की दिनांक २०/०४/२०२० रोजीच्या परिपत्रक अनुषंगाने नगरसेवक निधीमधून कोविड- १९ च्या उपाययोजना करिता रु १० लाखापर्यंतचा खर्च करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सदर खर्च आणि कामावर कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे नियंत्रण असणार आहे आणि खरेदी ही मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत निर्गमित केलेल्या दरपत्रिकेनुसार केली जाणार आहे.


निवेदनात पुढे असे नमूद केले आहे की मुंबईतील सर्व २२७ नगरसेवक आणि ५ स्वीकृत नगरसेवक यांनी केलेली मागणी, केलेला खर्च हा नगरसेवक नाव, प्रभाग क्रमांक, खर्चाचा तपशील आणि एकूण खर्च ही माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी,जेणेकरुन सामान्य मुंबईकरांना अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होऊ शकेल. सदर खर्च कसा करावा व त्यामध्ये पारदर्शकता कशी निर्माण होऊ शकेल यासाठी प्रभागमधील रहिवासी यांच्याकडून सूचना मागवून नगरसेवक यांनी त्यानुसार खर्च करावा तसेच प्रभागमध्ये एरिया सभा घेऊन सदर खर्चाचे पब्लिक ऑडिट व्हावे,अश्या मागण्या आहेत.

No comments:

Post a Comment