मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले असून नागरिकांच्या सहकार्याने गुन्हेगारीवर पोलीस प्रभावीपणे नियंत्रण आणू शकते, असा विश्वास साकीनाका पोलिस विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री डॉ रणजित पाटील, विधान परिषद विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे, खासदार पूनम महाजन आणि आमदार नसीम खान यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
साकीनाका, सफेदपूल येथील ईडन स्कूल आणि कॉलेज येथे पंचशील महिला मंडळ, अथक सेवा संघ आणि दशरथ मधूकुंटा या बिगर सरकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने साकीनाका पोलीस स्टेशनच्या अधिका-यांचा सार्वजनिक अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत, पोलीस निरीक्षक सुनील माने, कलीम शेख, अरविंद शिर्के, प्रविण माने यांचे सार्वजनिक अभिनंदन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन अजय शुक्ला आणि विकास शेळके यांनी केले. आभार प्रदर्शन अनिल गलगली यांनी मानले. यावेळी एक डॉकमेंटरी फिल्म दाखविली गेली ज्यात पोलीस अधिका-यांनी केलेल्या कामगिरीचा उहापोह करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन अनिल गलगली, मनाली गायकवाड, दिनेश मधूकुंटा, बाबू बत्तेली, राम साहू, सुभाष गायकवाड, जुबैर खान, सिकंदर शेख, अजय रजक यांनी केले होते. यावेळी अरशद अमीर, अण्णा परब, शुभ्राशुं दीक्षित, लारेन्स डिसोझा, मार्केडय सिंह,बाबा गायकवाड, विनोद तिवारी, सुभाष विश्वकर्मा, राजू साळवी, सुनील यादव, मनोज यादव, अवधूत शेलार, एड जितेंद्र तिवारी, दिनेश पाल,रामकेश यादव, जगन्नाथ उदुगडे, दिनेश सिंह, रविंद्र हिंगमिरे, सूर्या गौडा, एड उत्तम साहू, पवन राय, छाया मयेकर,किशोर ढमाळ,सुनील जैन, सदानंद घाटे, पुरुषोत्तम सोनी, वसंत ठक्कर, पत्रकार महेंद्र पांडे, पवन पाठक, रमझान चौधरी, रतीलाल आगरथडे, दत्ता पाटील, प्रो अजय घोसाळकर, राजकुमार दीक्षित, नंदू साळुंखे, प्रदीप बंड, पांडुरंग पांगीरे, राजेश सिंह, अब्बास मिर्जा, अशोक सिंह, शैलेश सिंह, प्रदीप सिंह, बाबू नाईक, प्रदीप सावंत, सुनील त्रिमुखे, सावजी पटेल, मंगला चव्हाण, पप्पू यादव, एमडी सिंह, मोज्जम खान, राजकुमार विश्वकर्मा, अजीज खान, राम गायकवाड, बळवंत कुबळ, रत्नाकर शेट्टी, अनिल गोळे, सुजाता ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यात आली.
No comments:
Post a Comment