Monday 7 January 2019

कोकण, पुणे आणि नागपूर येथील रिक्त माहिती आयुक्त पद भरण्याची मागणी

महाराष्ट्र शासनाने जनतेला माहितीचा अधिकार कायदा दिला असून महाराष्ट्र राज्य माहिती आयोग यासाठी स्थापन केले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस पाठविलेल्या पत्रात कोकण , पुणे आणि नागपूर येथील रिक्त राज्य माहिती आयुक्त पद भरण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस पाठविलेल्या पत्रात अनिल गलगली यांनी लक्ष वेधले आहे की महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात मुख्य माहिती आयुक्त सहित एकूण 8 राज्य माहिती आयुक्त आवश्यक आहेत पण मुख्य माहिती आयुक्त सहित 5 राज्य माहिती आयुक्त कार्यरत आहे. विशेष म्हणजे कोकण, पुणे आणि नागपूर येथील राज्य माहिती आयुक्त पद रिक्त असून त्याचा अतिरिक्त कार्यभार अन्य राज्य माहिती आयुक्त यांसकडे आहे ज्यामुळे राज्य माहिती आयुक्त यांची 2 राज्य माहिती आयुक्त पदाचा भार सांभाळता नाकी नऊ येते आणि मोठ्या प्रमाणात अपील संख्येत वाढ होत आहे.

अनिल गलगली यांनी मागणी केली आहे की महाराष्ट्र राज्य माहिती आयोगावर रिक्त असलेले कोकण, पुणे आणि नागपूर येथील राज्य माहिती आयुक्त पदावर सेवानिवृत्त अधिकारी ऐवजी सामाजिक आणि अन्य क्षेत्रातील अनुभवी आणि सेवा म्हणून काम करणाऱ्या लोकांची नेमणूका जाहिराती देत करण्यात यावेत.

No comments:

Post a Comment