✓ 11.21 कोटींची वाढ
✓ दोनदा मुदतवाढ
✓ एकाही रुपयांचा दंड नाही
✓ मध्य रेल्वेला दिले 35.91 कोटी
बहुप्रतिक्षित असा विद्याविहार पूर्व आणि पश्चिमेला जोडणा-या रेल्वे पुलाचे बांधकाम विलंबाने सुरु असून 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बांधकाम पूर्ण होईल,अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. अनिल गलगली हे गेल्या 14 वर्षांपासून विद्याविहार रेल्वे पुलांच्या जलद कामासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे विद्याविहार रेल्वे पुलाची माहिती मागितली होती. मुंबई महानगरपालिका पूल विभागाने अनिल गलगली यांस कळविले की या कामाचे कार्यादेश दिनांक 19 एप्रिल 2018 रोजी देण्यात आले होते आणि काम पूर्ण होण्याचे दिनांक 4 नोव्हेंबर 2020 असे आहे. विद्याविहार रेल्वे पुलाची लांबी 613 मीटर आहे. रेल्वे भागाची रुंदी 24.30 मीटर आहे तर पोहोच रस्त्याची रुंदी 17.50 मीटर अशी आहे. प्रकल्पाची एकूण किंमत 78 कोटी 19 लाख 28 हजार 895 रुपये इतकी आहे. मध्य रेल्वेला विविध परवानगीसाठी एकूण 35.91 कोटी देण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत कंत्राटदार ए. बी. इन्फ्राबिल्ड यास एकूण 57.90 कोटी दिले असून 20.28 कोटी शिल्लक रक्कम आहे. विशेष म्हणजे एकाही रुपयांचा दंड कंत्राटदार यावर आकारला नाही.
अनिल गलगली यांच्या मते अश्या प्रकल्पात खर्च वाढल्याने नुकसान होते पण वेळेत प्रकल्प पूर्ण न झाल्याने नागरीकांना त्रास सहन करावा लागतो. रेल्वे प्रशासनाकडून अश्या प्रकल्पात एकल खिडकी योजना सुरु केल्यास विविध परवानगी प्राप्त होण्यात विलंब होणार नाही.
No comments:
Post a Comment