Monday, 7 May 2018

मुंबईतील आरटीआय बचाव आंदोलनास प्रोफेशनल काँग्रेसचा पाठिंबा

देशभरात आरटीआय कायदाचा वापर आणि त्यामुळे सत्तेवर असणाऱ्या पक्षाला होणारा त्रास पहाता या कायदाची धार कमी करण्याचा प्रयत्न चोहोबाजूंनी होत आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात 'आरटीआय वाचवा' या अभियान अंतर्गत  'सत्यमेव जयते' चर्चासत्रात काँग्रेसच्या प्रोफेशनल विभागाने आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

प्रोफेशनल काँग्रेसच्या महाराष्ट्र मुंबई पूर्व विभागाने आयोजित चर्चासत्रात माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी आणि आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते आणि प्रोफेशनल काँग्रेसच्या महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष संजय झा यांनी भाग घेतला. या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील प्रोफेशनर्स आणि आरटीआय कार्यकर्ते यांनी भाग घेतला. पॅनलिस्ट शैलेश गांधी आणि अनिल गलगली यांस उपस्थितजणांनी अकार्यक्षम माहिती आयुक्त, अपील सुनावणीत दिरंगाई तसेच खाजगी क्षेत्र आणि राजकीय पक्षांना आरटीआयच्या कक्षेत आणण्याबाबत विविध प्रश्न विचारले ज्यांची उत्तरे दोन्ही पॅनलिस्ट यांनी अचूक दिली.

श्री गांधी यांनी राजकीय इच्छाशक्तींचा अभावामुळे शासनात पारदर्शक आणण्यासाठी सक्षम असलेला आरटीआय कायदा कार्यान्वित होत नसल्याची खंत व्यक्त करत प्रतिपादन केले की व्यक्तिगत ताकद ओळखा आणि यासाठी पुढाकार घ्यावा जेणेकरुन चुकीच्या लाभासाठी हा कायदा कमजोर होणार नाही.

अनिल गलगली यांनी समाजात बलशाली स्थानी असलेल्या लोकांपासून धोका उदभवला तर कोणती काळजी घेतली गेली पाहिजे, यावर भाष्य करत प्रतिपादन केले की सत्तेत असलेले नेहमीच या कायदाच्या विरोधात असतात आणि विरोधी पक्ष हा नेहमी या कायदाचे समर्थन करतात. मीडिया हा महत्वाचा भाग असून प्रत्येक गोष्टीचा पर्दाफास हा जनतेसमोर आणण्यासाठी मदतच होते.

डॉ शशी थरुर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपाध्यक्ष असलेले मिलिंद देवरा यांच्या मार्गदर्शनाखाली 'आरटीआय वाचवा' हे चर्चासत्र आयोजित केले गेले असून यापूर्वी सुद्धा अनेक उपक्रम राबविले गेले आहेत

No comments:

Post a Comment