Monday 11 December 2017

महाराष्ट्रातील आरोग्य सेवा ही अनाथ झाल्याचा सूर 

मुंबईत प्रथमच सामान्य नागरिक, डॉक्टर आणि विविध क्षेत्रातील नामवंतांनी एकत्र येत जागतिक मानव अधिकार दिनी वैद्यकीय सेवा आणि सामान्य नागरिकांचे अधिकार बाबत जनजागृती केली आणि महाराष्ट्रातील आरोग्य सेवा ही अनाथ झाल्याचा सूर सर्वच मान्यवरांच्या भाषणातुन उमटला. 

जागतिक मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून 'माझे आरोग्य माझे अधिकार' या विषयावर "डॉक्टर सिटीझन फोरम" यांच्या माध्यमातुन मुंबई मराठी पत्रकार संघात चर्चासत्र आयोजित केले गेले होते.गेल्या काही काळात डॉक्टरांवरील होणारे हल्ले, रुग्ण व डॉक्टर ह्यांमधील दुरावलेले संबंध आणि विश्वासहर्ता टिकवित यांस जवळीक साधण्यासाठी "डॉक्टर सिटीझन फोरम" ची स्थापना झाली. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका, सरकारी आणि खाजगी रुग्णालयातील परिस्थितीचे वर्णन करत सर्वत्र डॉक्टर,अधिकारी आणि कर्मचारी वृंदाची लक्षणीय कमतरता यावर प्रकाश टाकत आरोग्य क्षेत्रात निधीची कपात दुर्दैवी असल्याचे सांगितले. देशातील आरोग्य सेवा ही कुचकामी व्यवस्था आणि सरकारी अनास्थामुळे अनाथ झाल्याचे परखड मत गलगली यांनी व्यक्त केले. डॉ मुफझल लकडावाला (फाउंडर डायजेस्टीव हेल्थ इन्स्टिट्यूट) यांनी रुग्ण हक्क व जबाबदारी ह्या संदर्भात प्रकाश टाकला. 

डॉ मिरजकर यांनी मेडीकल निग्लेजन्सी बद्दल मत व्यक्त करत दरवेळेस डॉक्टर मृत्युस कारणीभूत नसतो तर परिस्थितीही कारणीभूत असते हे विचार मांडले. एड  पाठक यांनी वैद्यकीय क्षेत्रात आलेले विविध अनुभवाचे कथन केले. पंढरीनाथ सावंत (कार्यकारी संपादक, मार्मिक) यांनी राजकीय अनास्था व लोकांमधे असणारा जनजागॄतीचा अभाव यावर तफावत मांडली. डॉ ठाकुर ह्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात होणारे गैरव्यवहार व बेजबाबदार व्यवस्थापन यांचे साटेलोटे कसे असते यावर परखड मत मांडले. स्वाती पाटील यांनी आरोग्य सेवांसाठी सरकारवर दबाव वाढवणे गरजेचे असल्याचे सांगितले.  डॉ अभिजीत मोरे ह्यांनी सरकारच आरोग्यसेवेच खाजगीकरण करतेय की काय? यावर शंका उपस्थित केली.डॉ पिंगळे यांनी लाईफ विन एप बद्दल माहीती करुन दिली.कार्यक्रमाची सांगता प्रा.संदीप नेमलेकर (दीप-अर्चन) यांनी केली.

विनोद साडविलकर (सिटीझन डॉक्टर फोरम अध्यक्ष) यांच्या विनंतीस मान देऊन अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. जितेंद्र तांडेल(रुग्णकल्याण सेवा सामाजिक संस्था) संदीप तवसळकर, श्रीमती श्रेया निमोणकर(सेतु प्रतिष्ठान), मिलिंद निमोणकर, श्रीमती गमरे मॅडम, श्रीमती लखवीर कौर मॅडम व राजेंद्र ढगे (हॉस्पिटल प्रोजेक्ट मार्केटींग तज्ञ), चंद्रशेखर कुलकर्णी, अविनाश कदम, शिवराम सुकी, प्रकाश वाघ, कमल राव, पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उदय शिरुरकर(ब विभाग), श्रीमती वैभवी घाणेकर(महिला शाखा संघटक शिवसेना परळ), धर्मदाय रुग्णालयातील आरोग्य सेवक व सेविका यांच्या सक्रिय योगदानामुळे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला.एड विल्सन गायकवाड यांनी आलेल्या प्रमुख वक्त्यांचा परिचय करुन दिला व डॉ अभिजीत मोरे (जन आरोग्य अभियान) ह्यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. कुर्ला येथील गरीबांचा फोटोग्राफर म्हणुन नावाजलेले समाज सेवक आनंद सरतापे यांनी ह्या कार्यक्रमासाठी नि:शुल्क फोटोग्राफी केली त्याबद्दल फोरम तर्फे विनोद साडविलकर, जितेंद्र तांडेल व राजेंद्र ढगे यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

No comments:

Post a Comment