Wednesday, 27 December 2017

एसी लोकलच्या नावावर पश्चिम रेल्वेने बंद केलेल्या 12 फे-या पुन्हा सुरु करण्यात याव्यात

मुंबईत पश्चिम रेल्वेने दररोजच्या 12 सामान्य फे-या रद्द करत त्याऐवजी एसी लोकलच्या 12 फे-या सुरु केल्या आहेत. म्हणजे सामान्य प्रवाशांच्या तब्बल 12 फे-या कमी करत एसी सेवा सुरु केल्या आहेत. यामुळे आता 50 हजार प्रवाशांना त्रास होईल. हे फारच निराशाजनक आणि चुकीचा निर्णय असल्याचा आरोप करत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांस पत्र पाठवित मागणी केली आहे की एसी लोकलच्या नावावर पश्चिम रेल्वेने बंद केलेल्या 12 फे-या पुन्हा सुरु करत प्रवाशांना दिलासा दयावा. ।

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या मते आज 35 लाख प्रवासी पश्चिम रेल्वेने प्रवास करतात. 12 फे-या बंद केल्यामुळे 50 हजार प्रवाशांना त्रास होणार आहे. रेल्वेच्या अधिका-यांनी 12 विना AC असलेल्या फे-या रद्द करत त्याऐवजी एसी लोकलच्या 12 फे-या चालविण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आणि वस्तुस्थितीला धरुन नाही.  रेल्वे अधिका-यांनी सरकार आणि रेल्वे मंत्री यांस खूष करण्यासाठी असा विचित्र निर्णय घेतला असल्यास अश्या अधिका-यांस घरी विश्राम करण्यासाठी पाठविणे योग्य होईल कारण एसी लोकलच्या नावाखाली विना एसी असलेल्या 12 फे-या बंद करत 50 हजार प्रवाशांना अडचणीत आणले आहेत. कदाचित एसी लोकल सुविधाच्या नादात चांगली सेवा आणि विकासाचा प्रयत्न भविष्यात चुकीचा सिद्ध होईल कारण विना एसी असलेल्या 12 फे-या रद्द करत त्याऐवजी एसी लोकलच्या 12 फे-या सुरु करण्यात आल्या आहेत. यासाठी लवकरात लवकर पूर्वीच्या 12 फे-या सुरु करत प्रवाशांना दिलासा दयावा आणि 12 फे-या सुरु करण्यात रेल्वेची भलाई असल्याचे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment