Saturday 14 January 2017

एअर इंडियात 225 कोटींचा सॉफ्टवेअर घोटाळा आरटीआय नंतर उघडकीस

मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या आरटीआय नंतर 225 कोटींच्या एअर इंडिया सॉफ्टवेअर घोटाळा उघडकीस आला असून सीबीआयने गुन्हा दाखल केला आला आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने गुन्हा दाखल करत चौकशीची शिफारस सीबीआयस केली होती. वर्ष 2014 मध्ये अनिल गलगली यांच्याच तक्रारीवर कार्यवाही झाली आहे.

केंद्रीय सतर्कता आयोगाने एअर इंडिया, सॅप एजी आणि आयबीएमच्या अज्ञात अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल करत चौकशी सुरु केली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एअर इंडियाने कळविले होते की एअर इंडियाच्या संचालक मंडळाने याचा विचार करत निर्णय घेतला होता की एअर इंडियामध्ये सॅप ईआरपी प्रणाली कार्यान्वित करावी. डायरेक्टरोट जनरल ऑफ सप्लायस् अंड डिस्पोसल यांच्या दराप्रमाणे 225 कोटींची निश्चिती करण्यात आली त्यामुळे जाहिरात दिली गेली नाही. अनिल गलगली ने याबाबतीत केंद्रीय दक्षता आयोगास तक्रार दाखल करत कार्यवाहीची मागणी केली होती. आयोगाने सर्व दस्तावेजाचा सखोल अभ्यास करत सीबीआयस गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आणि सीबीआय ने नुकताच गुन्हा सुद्धा दाखल केला.

अनिल गलगली यांनी कार्यवाहीचे स्वागत करत मागणी केली आहे की या घोटाळयातील खरे राजकीय सूत्रधाराची सुद्धा नावे सार्वजनिक होणे तितकेच आवश्यक आहे.

1 comment:

  1. Sir we r proud of it work...pls go ahead we support u... inspire us by talking session about ur...we r eager to join the fight against corruption.

    ReplyDelete