कुर्ल्यामध्ये संत जलाराम बाप्पा यांची 224वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
कुर्ला विभागातील प्रसिद्ध जलाराम मंदिराच्या वतीने आज परमपूज्य संत जलाराम बाप्पा यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये असंख्य भाविक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्री कच्छी विसा ओसवाल सभागृह येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, विभागप्रमुख डॉ.महेश पेडणेकर, स्वराज्य युथ फोरमचे अध्यक्ष चेतन कोरगांवकर, उपशाखाप्रमुख दीपक देसाई, हेमंत सावंत, आरिफ शेख, अजीज खान, प्रसिद्ध उद्योजक किशोर मेहता आणि हजारो भक्तगण उपस्थित होते. मंदिराचे अध्यक्ष प्रकाश ठक्कर, भार्गव ठक्कर, महेंद्र हिंडोचा, रींकव ठक्कर, अरविंद पटेल, कन्हैया नागरानी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
No comments:
Post a Comment