Wednesday 5 February 2020

प्रथम वर्ष एमबीबीएस परिक्षेनंतरच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ट्रान्सफर धोरणात 40 टक्के अपंगत्वाची नवीन अट

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या मुख्य परिक्षेच्या व सप्लिमेंटरी परिक्षेच्या निकालानंतर, ज्या जागा विद्यार्थी नापास झाल्यामुळे किंवा सोडून गेल्यामुळे रिक्त होतात, त्या जागांवर विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या वैद्यकीय आजारपणाच्या कारणास्तव गुणवत्तेनुसार दुस-या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्रात इतरत्र ट्रान्सफर  (Transfer) देण्याचे प्रचलित धोरण गेल्या 10 ते 12 वर्षांपासून (2008 पासून) अस्तित्वात होते. पण अचानक यावर्षी कोणतीही पूर्वसूचना न देता यात 40 टक्के अपंगत्वाची नवीन अट घालण्यात आली आहे. याबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले आहे.


यावर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ट्रान्सफर धोरणाच्या प्रक्रियेसाठी अगोदरच विधानसभेच्या निवडणूक आचारसंहितेमुळे विलंब झाला असताना अचानकपणे कुठलीही पूर्वसूचना न देता प्रचलित धोरणामध्ये 40 टक्के किंवा अधिक अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र बदल करण्यात आला आहे. वरील बदल हा विद्यार्थ्यांना आणि पालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे ऐनवेळी करण्यात आल्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या विरुध्द असल्याची तक्रार अनिल गलगली यांची आहे. आधीच या प्रक्रियेला विलंब झाला असल्यामुळे विद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे व इतक्या कमी कालावधीत त्यांना अचानकपणे केलेल्या याबदलाप्रमाणे कागदपत्र प्राप्त करणे अशक्य आहे. त्यामुळे पूर्वीच्या धोरणाप्रमाणे यावर्षी कार्यवाही करण्याची विनंती अनिल गलगली यांनी श्री देशमुख यांसकडे केली आहे.

No comments:

Post a Comment