Tuesday 19 June 2018

मुंबई मेट्रोची स्वतंत्र क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरी नाही

मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड यांच्या मार्फत मुंबईत मुंबई मेट्रो 3 चे काम सुरु असून मुंबई मेट्रोची स्वतंत्र क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरी नसल्याची धक्कादायक कबूली आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडने दिली आहे. मुंबई मेट्रो लाईन 3 च्या कामामधील साहित्य आणि सर्व कामाची तपासणी सर्वसाधारण सल्लागारामार्फत करण्यात येते. 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडकडे स्वतःची अशी क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरी असल्यास त्याची माहिती विचारली होती. मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडचे जन माहिती अधिकारी आणि सल्लागार( समन्वय) श्रीनिवास नंदर्गीकर यांनी अनिल गलगली यांस कळविले की मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडची मेट्रोची स्वतंत्र क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरी नाही. मुंबई मेट्रो लाईन 3 च्या कामामधील साहित्य आणि सर्व कामाची तपासणी मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनने नेमलेल्या सर्वसाधारण सल्लागारा मार्फत करण्यात येते. ज्या पद्धतीने प्रचंड रक्कम खर्च करत मुंबई मेट्रो लाईन 3 चे काम सुरु आहे त्याचवेळी प्रत्येक साहित्य आणि सर्व कामाची तपासणी करण्यासाठी सर्वसाधारण सल्लागारामार्फत केल्या जाणाऱ्या तपासणीच्या गुणवत्तेवर मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन विसंबून राहत आहे, याबाबत अनिल गलगली यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस लिहिलेल्या पत्रात स्वतंत्र अशी मुंबई मेट्रोची क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरी सुरु करत एमएमआरडीए प्रशासनात सुद्धा अश्याच प्रकाराची  क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरी सुरु करण्याची मागणी सरतेशेवटी गलगली यांची आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने तर जिल्हा स्तरावर अश्या क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरी बनविल्यात आहे. मग मेट्रो सारख्या प्रकल्पात अशी हलगर्जीपणा होण्याबाबत गलगली यांनी चिंता व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment