Tuesday 20 February 2018

मुंबई क्रिकेट एसोसिएशनने पोलीस बंदोबस्ताचे 13.42 कोटी थकविले

मुंबई पोलीस दलातील हजारों पोलीस क्रिकेट वर्ल्ड कपच्या बंदोबस्तासाठी जुंपले जात असून त्या बंदोबस्ताचे शुल्क अदा करण्यात मुंबई क्रिकेट एसोसिएशन चालढकल करत आहे. मागील 17 क्रिकेट स्पर्धेकरिता पुरविण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताचे रु 13.42 कोटी आजपर्यंत अदा केले नसल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई पोलीसांनी दिली आहे. एनसीपी नेते शरद पवार आणि भाजपा नेते आशिष शेलार यांच्या पैनलची निर्विवाद सत्ता मुंबई क्रिकेट एसोसिएशन यात असल्यामुळेच मुंबई पोलीस सावधगिरी बाळगत आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलीसांकडे गेल्या 10 वर्षात संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी दिला गेलेला पोलीस बंदोबस्त आणि शुल्काची माहिती मागितली होती. जन माहिती अधिकारी आणि सहायक पोलीस आयुक्त (समन्वय) तानाजी सुरुलकर यांनी बंदोबस्त शाखेने दिलेली माहिती उपलब्ध करत कळविले की 3 आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वकप, महिला विश्वकप, सराव सामने, टेस्ट आणि वन-डे सामने असे 17 सामने खेळले गेले. या सामनाच्या शुक्लापायी 13 कोटी 41 लाख 74 हजार 177 इतकी रक्कम अदा करणे आवश्यक होती पण गेल्या 62 महिन्यांपासून ही रक्कम मुंबई क्रिकेट असोसिएशनने अदा केली नाही.

गेल्या 62 महिन्यापासून थकबाकी असलेली कोटयावधीची रक्कम वसूल करण्यासाठी जी कार्यवाही सुरु आहे त्या रक्कमेवर मुंबई पोलीसांनी कोणतेही व्याज आकारले नाही. रु 13.42 कोटीच्या थकबाकी रक्कमेवर व्याज न आकारण्यामुळे मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी वर्ष 2008 पासून 2011 या दरम्यान मध्ये झालेल्या सामन्यांचे बंदोबस्त शुल्क रु 34 कोटी 33 लाख 44 हजार 618 अदा करण्यात आली आहे. या सामनाचे शुल्क इंडिया विन स्पोर्ट्स प्राईवेट लिमिटेडने वेळेवर अदा केले नसतानाही मुंबई पुलिस ने कोणत्याही प्रकारचे व्याज वसूल केले नाही.अनिल गलगली यांनी यापूर्वी 2016 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस आयुक्त यांस पत्र पाठवूनही मुंबई पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

अनिल गलगली यांच्या मते पोलीस बंदोबस्ताच्या बळावर अफाट नफा कमविणा-या मुंबई क्रिकेट एसोसिएशनने बंदोबस्त शुल्क ताबडतोब अदा करणे आवश्यक होते. सशस्त्र दलाच्या निष्काळजीपणामुळे शुल्क वसूल केले नसून पोलीस आयुक्तांनी जबाबदार अधिकारीवर्गावर नियमाप्रमाणे कार्यवाही करत अश्या सामन्यांचे शुल्क सामना संपताच वसूल करावे किंवा क्रिकेट स्पर्धा आयोजकांकडून आधीच शुल्क वसूल करावे. जेणेकरुन पोलीसांस बंदोबस्ताचे शुल्क वसूलीचा मनस्ताप सहन करावा लागणार नाही.

No comments:

Post a Comment