Wednesday, 31 January 2018

एमएमआरडीएचे मराठी आणि इंग्रजी कच्चे 

एमएमआरडीए प्रशासनाने चिंचपोकळी येथे लावलेले नामफलकात इंग्रजी आणि मराठीची ऐसी-तैसी केली असून इंग्रजीत Late Com. Gulabrao Ganacharya Chowk आणि मराठीत कै. कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य असे नामफलक असणे आवश्यक आहे. 

याबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यूपीएस मदान यांस लेखी पत्र पाठवून मागणी केली आहे की ज्या कंत्राटदारानी चूक केली आहे त्यावर दंड आकारत चूक सुधारावी आणि दुरुस्ती करावी. तसेच एमएमआरडीए प्रशासनाने जेथे जेथे अश्या प्रकाराचे नामफलक लावले आहे तेथे पुनश्च तपासणी करावी आणि चूक सुधारावी.

No comments:

Post a Comment