Thursday, 17 August 2023

कुर्ल्यातील रखडलेले स्कायवॉकचे काम पूर्ण होईल एप्रिल 2024 मध्ये

कुर्ल्यातील रखडलेले स्कायवॉकचे काम पूर्ण होईल एप्रिल 2024 मध्ये

कुर्ला पश्चिम लाल बहादुर शास्त्री मार्गावर नागरिकांना रस्ता ओलंडण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेता पालिकेने स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेतला पण मागील 2 वर्षापासून काम रखडलेले आहे. कुर्ल्यातील रखडलेले स्कायवॉक 23 एप्रिल 2024 मध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेकडे कुर्ला पश्चिम येथील रखडलेल्या स्कायवॉकबाबत विविध माहिती विचारली होती. मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाचे सहाय्यक अभियंता अमित भंडारी यांनी अनिल गलगली यांस कळविले की 18 ऑगस्ट 2021 रोजी एनए कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस कार्यादेश जारी केले. 15.40 कोटींचे कंत्राट असून 15 महिन्यात काम पूर्ण करणे आवश्यक होते. कुर्ला पश्चिम भेरुलाल मार्गावरील बीकेसी येथील टॅक्सी मेन कॉलनी पासून न्यू मिल रोड येथील श्रीकृष्ण चौकापर्यंत स्कायवॉकचे काम मागील 254 दिवसापासून बंद आहे. कंत्राटदारावर केवळ 25 हजारांचा दंड आकारला आहे. सद्यस्थितीत काम पावसाळयाकरिता बंद ठेवण्यात आले आहे.

अनिल गलगली यांच्या मते हा स्कायवॉक महत्वाचा आहे. आज दररोज हजारों नागरिक जीव मुठीत धरून एलबीएस मार्ग ओलंडतात. यामुळे वाहतुक प्रभावित होती. पालिकेने मुदतवाढ दिली असली तरी या मुदतीत काम पूर्ण होणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment