विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघात मुंबई पोलीस दलाचे सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांचा जाहीर सत्कार सोहळा संपन्न झाला. सकाळचे सहयोगी संपादक अंकित काणे यांनी अविनाश धर्माधिकारी यांची यादगार मुलाखत घेत विविध पैलूवर प्रकाश टाकला.
यावेळी सनदी अधिकारी अजित जोशी यांच्या हस्ते सत्कार अविनाश धर्माधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार पराग अळवणी, ज्येष्ठ अभिनेते प्रदिप वेलणकर, अनुजा अविनाश धर्माधिकारी, अनिल गलगली तसेच लोकमान्य सेवा संघाचे पदाधिकार मुकुंद मनोहर चितळे, उदय तारदाळकर, महेश काळे, डॉक्टर रश्मी फडणवीस आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्र संचालन विनीत गोरे यांनी केले. अविनाश धर्माधिकारी यांनी मनोगत व्यक्त करत प्रतिपादन केले की समाजासाठी आणि देशासाठी काही तरी करायाचे आहे या भावनेने काम करत राहणार.
No comments:
Post a Comment