Wednesday, 26 April 2023

सिडकोची अंशत: पारदर्शकता

सिडकोची अंशत: पारदर्शकता

फाईलची स्थिती पोर्टलवर ऑनलाइन करणे आवश्यक

प्रकल्प बाधित व्यक्तींची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्याची मागणी करणारे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यामुळे सिडको ने अंशत माहिती अपलोड केली आहे. खरे पाहिले तर फाईलची स्थिती पोर्टलवर ऑनलाइन केल्यास ख-या अर्थाने सिडको पारदर्शक होईल.

दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सिडकोकडे अर्ज करत सिडको अंतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकरी यांस देण्यात आलेल्या भूखंडांची माहिती आणि आणि प्रतीक्षा यादीची मागितली होती. सिडकोचे सहाय्यक विकास अधिकारी श्रीकांत पावसकर यांनी संचिका क्रमांक आणि गाव याबाबत माहिती देत संचिका तपासणी करण्याचे पत्र गलगली यांस पाठविले होते. या बाबतीत अनिल गलगली यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जी यांस पत्र पाठविले होते. यानंतर सिडकोने नुकतेच पात्रता यादी, संचिका क्रमांक, गाव आणि बांधकाम निहायतपशील तसेच वाटपपत्र आणि करारनामाची तारीख संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे.

याबाबत अनिल गलगली म्हणतात की जमीन वाटप जमिनीचा निवाडा होईपर्यंत, फाईलची स्थिती पोर्टलवर प्रदर्शित करावी. वाटप प्रक्रियेत पारदर्शकता राखली गेली पाहिजे आणि पोर्टलवर स्थिती प्रदर्शित केली जावी. संबंधित फाइलसाठी पोर्टलवर टिप्पणी आणि त्रुटी, सद्य कायदेशीर स्थिती नमूद करावी. सद्याची उपलब्ध माहिती म्हणजे तोंडाला पाने पुसली आहेत आणि आजही सिडको प्रशासन आणि येथील अधिकारी पारदर्शक कामकाजासाठी तयार नाहीत, असे गलगली यांनी नमुद केली आहे.


No comments:

Post a Comment