Sunday 30 April 2017

3 वर्षात धर्म बदलण्यात 3 पटीने वाढ

महाराष्ट्रात नाम आणि जन्म दिनांक बदलण्यासोबत धर्म बदलण्यावर अधिक जोर आहे. गेल्या 3 वर्षात धर्म धर्म बदलण्यात 3 पटीने वाढ झाली आहे. प्रतिदिवशी 2 लोग आपला धर्म बदलण्याची माहिती आरटीआय कार्यकर्तेअनिल गलगली यांस महाराष्ट्र शासनाने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी शासकीय मुद्रण, लेखनसाम्रगी व प्रकाशन संचालनालयाकडे  3 वर्षात नाव, जन्म दिनांक आणि धर्म बदलण्याची माहिती मागितली होती. शासकीय मुद्रण, लेखनसाम्रगी व प्रकाशन संचालनालयाचे यंत्र अभियंता (टंक) अ. स.उदावंत यांनी अनिल गलगली यांस कळविले की वर्ष 2014, वर्ष 2015 आणि वर्ष 2016 या 3 वर्षाची माहिती दिली. धर्म बदलण्याच्या संख्येत 3 पटीने झालेली वाढ आश्चर्यजनक आहे. वर्ष 2014 मध्ये 247 लोकांनी आपला धर्म बदलला आहे. ज्यात वर्ष 2015 वाढ होत ती संख्या 615 झाली आणि वर्ष 2016 मध्ये 797 पर्यंत पोहचली. यात अर्ज फेटाळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. वर्ष 2014 मध्ये 33, वर्ष 2015 मध्ये 60 आणि वर्ष 2016 मध्ये 45 अर्ज फेटाळले आहे. धर्म बदलण्यासाठी अर्जदारांनी वर्ष 2014 मध्ये रु 65,581/-, वर्ष 2015 मध्ये रु 2,61,714/- आणि वर्ष 2016 मध्ये रु 3,43,031/- इतकी रक्कम अदा केली.

वर्ष 2014 मध्ये 59,200  लोकांनी नाव बदलण्यासाठी रु 1,48,85,492/- इतकी रक्कम अदा केली तर 5750 अर्ज फेटाळले. वर्ष 2015 मध्ये 1,56,477 लोकांनी नाव बदलण्यासाठी रु 6,87,23,265/- इतकी रक्कम अदा केली तर 15,480 अर्ज फेटाळले. वर्ष 2016 मध्ये 1,82,977 लोकांनी नाव बदलण्यासाठी रु 8,37,21,464/- इतकी रक्कम अदा केली. तर 14184 अर्ज फेटाळले. वर्ष 2014 मध्ये 1432 लोकांनी जन्म दिनांक बदलली ज्यासाठी रु 3,24,090/-  रक्कम अदा केली तर 326 अर्ज फेटाळले. वर्ष 2015 मध्ये 3481 लोकांनी जन्म दिनांक  बदलली ज्यासाठी  रु 14,49,423/-  अदा केली तर 468 अर्ज फेटाळले. वर्ष 2016 मध्ये  3583 लोकांनी जन्म दिनांक बदलली ज्यासाठी रु 16,07,950/- अदा केले तर 278 अर्ज फेटाळले.

No comments:

Post a Comment