Wednesday 12 October 2016

मुंबई विद्यापीठात 'आरटीआय' वर व्याख्यान

मुंबई विश्वविद्यालय तर्फे संचालित गरवारे इंस्टिट्यूटमध्ये हिंदी पत्रकारिता करणा-या विद्यार्थ्यास  'माहितीचा अधिकार कायदा या विषयावर माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते अनिल गलगली यांचे व्याख्यान आयोजित केले होते. विद्यार्थ्यास कायदाची माहिती देताना अनिल गलगली यांनी माहितीचा अधिकार आणि पत्रकारिता एकमेकांशी कसे पूरक आणि जोडलेले आहेत यास उदाहरण देत स्पष्ट केले.
आरटीआयच्या सकारात्मक वापराची गरज असल्याचे सांगत अनिल गलगली यांनी प्रतिपादन केले की सामाजिक, राजकीय आणि शिक्षण क्षेत्रात आरटीआय कायदाने नवीन बदल घडवित क्रांति आणण्याचे भरीव काम केले. सत्तेत असणारे सत्ताधारी असोत किंवा सरकारी अधिकारी यांस या कायदाने जबाबदारी आणि कामकाजात पारदर्शिता आणण्यास बाध्य केले. अनिल गलगली यांनी समाजातील प्रत्येकांनी आपल्या जीवनात एकदा तरी आरटीआय वापर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची अध्यक्षता करणारे ज्येष्ठ पत्रकार सरोज त्रिपाठी यांनी सुचना मांडली की खाजगी क्षेत्रास आरटीआय कायदा लागू करण्यासाठी सरकार वर जनतेने दबाव आणला पाहिजे.
जेष्ठ पत्रकार सैयद सलमान यांनी सुद्धा आरटीआयची आवश्यकतेवर मत मांडत प्रतिपादन केले की प्रशिक्षण घेणा-या पत्रकारांनी माहितीचा अधिकार या कायदाचा विस्तृत अभ्यास आणि जनहितार्थ वापर करावा.

कार्यक्रमाचे संचालन शैलेश तिवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश पांडेय यांनी मांडले.

No comments:

Post a Comment