Wednesday 19 October 2016

12 वर्षापासून कला संचालनायास पूर्णकालिक संचालक मिळेना

महाराष्ट्रात नवीन सरकार येताच कला महासंचालनायाचे 'अच्छे दिन' येण्याची आशा बाळगणारे सद्या निराश झाले आहेत. राज्यातील विविध कलेस वाव देण्याच्या पवित्र्य उद्देश्याने ज्या कला महासंचालनायची स्थापना करण्यात आली त्या महासंचालनायस गेल्या 12 वर्षापासून पूर्णकालिक संचालक न सापडल्यामुळे सद्या प्रभारी संचालकाच्या हवाली कला महासंचालनाय असल्याची धक्कादायक आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस कला महासंचालनायाने दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी कला महासंचालनायाकडे गेल्या 15 वर्षापासून कार्यरत असलेले संचालक आणि प्रभारी संचालकाची माहिती विचारली होती. कला महासंचालनायाचे जन माहिती अधिकारी ना. मा. वाघमोडे यांनी अनिल गलगली यांस वर्ष 1999 पासून आजमितीपर्यंत कार्यरत असलेल्या संचालकाची यादी दिली. या यादीत 1 जून 1999 पासून 30 जून 2004 या 5 वर्षासाठी संचालक या नात्याने प्रा. म.भा.इंगळे हे कार्यरत होते. इंगळे यांचा एकमेव अपवाद सोडता आजमितीपर्यंत संचालक पद पूर्णकालिक राहिले नाही. आतापर्यंत 9 प्रभारी संचालकानी कला महासंचालनायाची धुरा सांभाळली आहे त्यात प्रा. ल.म.ऐवले, प्रा.एस. बी. ठाकरे, प्रा.न. वा.पासलकर, डॉ र.च.बाळापुरे, प्रा. हे.रा.नागदिवे, पु.हि.वागदे, जी.बी.धनोकार, प्रा.गो.गो.वाघमारे आणि प्रा. राजीव मिश्रा यांचा समावेश आहे. सद्या असलेले मिश्रा हे 1 डिसेंबर 2015 पासून प्रभारी संचालक आहेत. कला संचालक पद भरण्याची जबाबदारी बाबत माहिती विचारली असता अनिल गलगली यांस कळविले गेले की कला संचालनालय आणि उच्च व तंत्र शिक्षण खात्याची जबाबदारी असून ते सक्षम प्राधिकरण आहे.

अनिल गलगली यांनी याबाबतीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस पत्र पाठवून कला संचालनायास न्याय देत संचालक पद ताबडतोब भरण्याची मागणी केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे अश्या महत्वाच्या कला संचालनायाकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत अनिल गलगली यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment