Wednesday 11 May 2016

4 दशकाचा अभिलेख नाही मग कशी मिळाली मोदी यांची पदवी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीएची पदवी सार्वजनिक करणा-या दिल्ली विश्वविद्यालयाने सप्टेंबर 2015 मध्ये मुंबईतील आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस कळविले होते की 4 दशकाचा अभिलेख त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे आणि वर्ष 1978 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांची माहितीसाठी संबंधित महाविद्यालयास संपर्क करावा. अनिल गलगली यांनी आता याविरोधात दिल्ली विश्वविद्यालयात अपील दाखल केले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिल्ली विश्वविद्यालयकडे 11 सप्टेंबर 2015 रोजी वर्ष 1978 मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांची माहिती मागत यादी देण्याची मागणी केली होती. दिल्ली विश्वविद्यालयातील केंद्रीय जन माहिती अधिकारी जय चंद्रा यांनी अनिल गलगली यांस कळविले की सहायक परीक्षा नियंत्रक(परिणाम) आणि सांख्यिकीय अधिकारी(योजना इकाई) यांनी मागितलेली माहिती 4 दशक जुनी असल्यामुळे ही माहिती त्यांच्या विभागात उपलब्ध नाही आहे.सहायक परीक्षा नियंत्रक(परिणाम) यांच्या मते परीक्षा परिणामाची प्रति परीक्षा विभागातर्फे संबंधित महाविद्यालयास पाठविल्या जातात त्यामुळेच माहिती साठी अर्जदार हे संबंधित महाविद्यालयाकडे संपर्क स्थापित करु शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 1978 ची पदवी दस्तुरखुद्द दिल्ली विश्वविद्यालय तर्फे सार्वजनिक केली गेली आणि तेच दिल्ली विश्वविद्यालय त्यांची दिशाभूल करण्याचा आरोप करत अनिल गलगली यांना दिल्ली विश्वविद्यालयास प्रथम अपील दाखल करत मोदी यांच्याच धर्तीवर वर्ष 1978 मध्ये बीए मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांची यादी देण्याची मागणी केली आहे.अनिल गलगली यांनी दिल्ली विश्वविद्यालयाचे वाईस चांसलर योगेश त्यागी आणि रजिस्टार तरुण राज यांस लेखी पत्र पाठवून या दोहेरी भूमिकेवर आश्चर्य व्यक्त करत त्या अधिका-यांवर कारवाई करत त्यांस वर्ष 1978 मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांची माहिती देण्याचे आदेश देण्याची पुनश्च मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment