Tuesday 17 May 2016

मुंबई उपनगरी रेल्वेच्या 131 कर्मचा-यांचा रेल्वे ट्रैकने घेतला बळी

मुंबई उपनगरी रेल्वेच्या ट्रैकवर होणा-या अपघातात रेल्वे प्रवाशांचा मृत्यु होतो अशाचा भाग नसून रेल्वेच्या विविध कामात असलेले कर्मचा-यांचा सुद्धा बळी जातो. दरवर्षी सरासरी 12 बळी घेणा-या रेल्वेच्या ट्रैकवर झालेल्या अपघातात गेल्या 6 वर्षात तब्बल 131 कर्मचा-यांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस लोहमार्ग पोलीसांनी दिली आहे.सर्वाधिक 19 बळी दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले असून त्यानंतर 17 बळी घेणा-या कुर्ल्याचा नंबर लागतो. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी वर्ष 2010 ते 2015 या कालावधीत रेल्वे टैकवर अपघात झालेले रेल्वे कामगार, कंत्राटी कामगार आणि गैंगमेन यांची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मागितली होती. लोहमार्ग पोलीसांनी अनिल गलगली यांस कळविले की मुंबई पोलीस लोहमार्ग पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गेल्या 6 वर्षात एकूण 131 कर्माचा-यांचा मृत्यु रेल्वे ट्रैकवर झालेल्या अपघातात झाला आहे. रेल्वेच्या 16 पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक मृत्यु दादर रेल्वेच्या हद्दीत झाले असून त्याची संख्या 19 आहे. त्यानंतर 17 कुर्ला, कल्याण 14, डोंबिवली 13, सीएसटी 11, ठाणे 10, कर्जत 5 प्रत्येकी 7-7 मृत्यु पालघर,बोरीवली, प्रत्येकी 6-6 मृत्यु वसई रोड, अंधेरी , प्रत्येकी 4-4 वाशी, बांद्रा आणि मुंबई सेंट्रल, पनवेल 3, वडाळा 1 अशी क्रमवारी आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी वर्ष 2010 ते 2015 या कालावधीत रेल्वे टैकवर अपघात झालेले रेल्वे कामगार, कंत्राटी कामगार आणि गैंगमेन यांची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मागितली होती. लोहमार्ग पोलीसांनी अनिल गलगली यांस कळविले की नुकसानभरपाई रेल्वे प्रशासनाकडून दिली जाते त्यामुळे सदरची माहिती इकडील कार्यालयाकडे आणि संबंधित पोलीस ठाण्याकडे उपलब्ध नाही. रेल्वे टैकवर अपघात होताच नेहमीच रेल्वे प्रवाश्यांना दोष देणारे रेल्वे प्रशासन रेल्वे कर्मचा-यांच्या अपघाताकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अनिल गलगली यांनी केला आहे. अश्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यास रेल्वे प्रशासन अपयशी ठरले आहे,अशी टीका अनिल गलगली यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment