Tuesday 16 February 2016

पद्मभूषण शापूरजी पालनजी भागीदार असलेल्या एसडी कारपोरेशन ने मुंबई पोलिसांस गंडविले

मुंबई पोलिस विभागाच्या जागेवर झोपडपट्टी पुर्नविकास करण्याच्या नावाखाली 2 इम्पीरियल टावर बांधणा-या पद्मभूषण शापूरजी पाल्लोंजी भागीदार असलेल्या एसडी कारपोरेशन ने मुंबई पोलिसांस गंडवित 3025.75 चौरस मीटरचे बांधकाम केले नसून जागेबाबत झालेल्या अव्यवहाराची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरु असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई पोलिसांनी दिली आहे. नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाजपा सरकारने विकासक असलेल्या शापूरजी पालनजी यांस सर्वोच्च अशा पद्मभूषण पुरस्कार देण्याची घोषणा केलेली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी 19 आक्टोबर 2015 रोजी राज्यातील विविध ठिकाणी पोलिसांसाठी राखीव असलेल्या भूखंडाची माहिती आणि सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांस अर्ज केला असता त्यांनी तो अर्ज राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांस हस्तांतरित केला. मुंबई पोलीस आयुक्तालयाचे शासकीय माहिती अधिकारी आणि सहायक पोलीस आयुक्त संजय रांगणेकर यांनी अनिल गलगली यांस मुंबईतील 4 प्रकरणाची माहिती दिली ज्यांनी मुंबई पोलिसांची फसवणूक करत गंडविले होते त्यात पद्मभूषण शापूरजी पालनजी भागीदार असलेल्या एसडी कारपोरेशनचा प्रथम क्रमांक लागतो. मुंबईतील ताडदेव येथील एम पी मिल कंपाउंड मधील 4.26 हेक्टर जमीन झोपडपट्टयांनी अतिक्रमित होती. सदर जमीनीचा पुर्नविकास करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 2/2/1989 रोजी निर्गमित केले. त्यामध्ये 3.31 हेक्टर जमीन झोपडपट्टी पुर्नविकासासाठी आणि उर्वरित 0.95 हेक्टर ( 9500 चौरस मीटर) जमीन ही पोलीस विभागासाठी राखीव ठेवण्याचे आदेश होते. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुर्नविकास अंतर्गत निर्गमित केलेल्या लेटर ऑफ इंटेड (आशयपत्र) मध्ये 9100 चौरस मीटरच्या बदल्यात 3025.75 चौरस मीटरचे बांधकाम क्षेत्र विकासक पद्मभूषण शापूरजी पालनजी भागीदार असलेल्या एसडी कारपोरेशन यांनी विनामूल्य बांधून देण्याचे आदेश दिले. त्याअनुषंगाने 68 सदनिकांचे आराखडे पाठविले परंतु शासनाच्या दिनांक 2/2/1989 च्या आदेशाप्रमाणे 0.95 हेक्टर (9500 चौरस मीटर)जागा मुंबई पोलिसांस मिळणे आवश्यक असताना 9100 चौरस मीटर इतके क्षेत्रफळ नमूद केले गेले. म्हणजे 400 चौरस मीटर इतके क्षेत्रफळ कमी दाखवित फसविले. त्यामुळे अपर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांनी 7 मे 2015 रोजी पद्मभूषण शापूरजी पालनजी भागीदार असलेल्या एसडी कारपोरेशन या कंपनीची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करण्याची विनंती मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांस केली आणि मारिया यांनी दिनांक 24 जून 2015 रोजी सह पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा यांस चौकशी करत अहवाल सादर करण्याचे आदेश जारी केले असून सद्या हे प्रकरण वरिष्ठ पोलीस निरिक्षक कापसे यांस कडे प्रलंबित आहे. अश्या प्रकारे पद्मभूषण शापूरजी पालनजी भागीदार असलेल्या एसडी कारपोरेशन या कंपनीने स्व:ताचे 2 उंच असे इंपेरियल टावर तर फटाफट बांधले पण मुंबई पोलिसांना कोणतीही खुली जमीन दिली नाही ना 3025.75 चौरस मीटरचे बांधकाम क्षेत्र हस्तांतरित केले. गेल्या 17 वर्षापासून सदर प्रकल्प सुरु आहे, ही विशेष बाब आहे. अशी वस्तुस्थिती आणि चौकशी सुरु असताना ज्या व्यक्तीच्या भागीदार असलेल्या एसडी कारपोरेशन या कंपनीने मुंबई पोलिसांची फसवणूक करत अक्षरश: गंडविले त्या व्यक्तीस पद्मभूषण देण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न बरोबर नसल्याचे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले. उद्या चौकशीनंतर गुन्हा दाखल झाला तर पद्मभूषण पुरस्काराची नाचक्की होईल आणि सरकारची बदनामी होईल, अशी भीती गलगली यांनी व्यक्त केली. पद्मभूषण शापूरजी पालनजी भागीदार असलेल्या एसडी कारपोरेशन सारख्या आणखी 3 विकासकानी मुंबई पोलिसांस गंडविले होते पण आता नमले आहेत. वर्सोवा येथील यारी रोड येथे मेसर्स लॉजीस्टिक्स कंपनीने पोलिसांच्या नावावर असलेल्या 11 सदनिका देण्याचे मान्य केले आहे तर म्हाडाच्या मालकीच्या जागेवर 748 चौरस मीटर जमीन पोलीस विभागासाठी आरक्षित आहे. मेसर्स रिचा डेवलपर्स आता पोलीसांसाठी विनामुल्य पोलीस ठाणे बांधून देणार आहे आणि 60 सदनिका सवलतीच्या दरात बांधून देण्यास तयार आहे. तसेच विक्रोळी, टागोर नगर येथील इमारत क्रमांक 54 मधील 8 सदनिका पोलीस विभागाच्या मालकीच्या असून विकासक मेसर्स आदित्य इंटरप्राइजेस यांनी पोलीस विभागाच्या परवानगीशिवाय परस्पर पुर्नविकास केल्या आहेत पण विकासकाने म्हाडाची परवानगी घेतल्याचे कळविले आहे. आता काही थकबाकी असलेली रक्कम अदा केल्यानंतर 8 सदनिका पोलीस विभागास प्राप्त होतील.

No comments:

Post a Comment