Thursday, 10 October 2024

बेघर मुक्त मुंबई करणे आवश्यक - अनिल गलगली

बेघर मुक्त मुंबई करणे आवश्यक - अनिल गलगली

मुंबईत जागतिक बेघर दिवस

मुंबईतील पदपथावर राहणाऱ्या बेघरांच्या हक्कांसाठी शासनाने विविध योजनेची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. शासनाला बेघर मुक्त मुंबई करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केले.

जागतिक बेघर दिवस निमित्ताने मुंबईतील पहचान संस्थेच्या पुढाकाराने माहीम आणि कामाठीपुरा येथे बेघरांसाठी कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष आणि राज्य निवारा सनियंत्रण समितीचे सदस्य ब्रिजेश आर्य यांनी केले होते. यावेळी उपस्थित आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले की सततच्या पाठपुराव्यानंतर आता मुंबई महापालिकेने बेघरांसाठी प्रशिक्षण आणि निवारा देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वांना हक्काची घरे मिळाल्यास प्रश्न मार्गी लागेल. बेघर मुक्त मुंबई करणे आवश्यक आहे. ब्रिजेश आर्य म्हणाले की समस्या फार आहेत आणि आता सकारात्मक बदल दिसून येत आहे. सर्वांनी मिळून याचा सामना करण्याची गरज आहे. यावेळी बाबू बत्तेली, जगदीप अरोरा, रत्नाकर शेट्टी, शिवाजी लोंढे  सुभाष रोकडे, मनस्वी जैन  रामू परमार, बसंती परमार,   गीता चावडा, मधु परमार, अर्जुन उपस्थित होते. यावेळी माय मुंबई दिनदर्शिकेसाठी राहुल परमार, मनोहर परमार, अर्जि परमार यांना फुजी कॅमेरा देण्यात आले.

No comments:

Post a Comment