Wednesday 4 September 2024

मध्य रेल्वेने 4 महाकाय होर्डिंग काढले तर 14 होर्डिंगचा आकार केला कमी

मध्य रेल्वेने 4 महाकाय होर्डिंग काढले तर 14 होर्डिंगचा आकार केला कमी

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य रेल्वेने 4 महाकाय होर्डिंग काढले तर 14 होर्डिंगचा आकार कमी केली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वेने दिली आहे. तर पश्चिम रेल्वेने मागितलेली माहिती स्पष्ट नसल्याचे सांगत कारवाईची माहिती दिली नाही.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वेकडे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केलेल्या कारवाईची माहिती मागितली होती. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक बी अरुण कुमार यांनी केलेल्या कारवाईची यादी दिली. या यादीत 18 पैकी 4 होर्डिंग कायमस्वरूपी निष्कासित करण्यात आले आहे. यात सँडहर्स्ट रोड ( 3200 फूट), चुनाभट्टी ( 3200 फूट), टिळक नगर येथील 2 ठिकाण ( 1598 फूट ) आहेत. मेसर्स रोशन स्पेस यांची 2 तर मेसर्स पायोनियर आणि मेसर्स अलख यांची प्रत्येकी 1 होर्डिंग आहेत.

ज्या होर्डिंगचा आकार कमी केला त्यात वाडी बंदर, भायखळा येथील 3, चुनाभट्टी येथील 5, सुमन नगर येथील 3 आणि टिळकनगर येथील 2 ठिकाणचा समावेश आहे. 14 होर्डिंगचा आकार कमी केला आहेत त्यात 7 देवांगी आऊटडोअर, 2 मेसर्स रोशन स्पेस, 2 मेसर्स झेस्ट एंटरप्राइज, मेसर्स वॉललोप, मेसर्स कोठारी आणि मेसर्स नुकलेसईट्स यांची प्रत्येकी 1 होर्डिंग आहेत.

पश्चिम रेल्वे संभ्रमात

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वेकडे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केलेल्या कारवाईची माहिती मागितली होती.पश्चिम रेल्वेचे जन माहिती अधिकारी सौरभ कुमार यांनी मागितलेली माहिती स्पष्ट नसल्याचे सांगत कारवाईची माहिती दिली नाही.

अनिल गलगली यांनी मध्य रेल्वेच्या उपाययोजनावर आनंद व्यक्त केला आहे. यामुळे भविष्यात घाटकोपर सारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही.

No comments:

Post a Comment