Tuesday, 24 November 2020

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या होर्डिंगच्या उत्पन्नात वाढ झाली

मुंबई विभागांतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या होर्डिंग्जच्या वाढत्या उत्पन्नाची माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना देण्यात आलेल्या माहितीतून समोर आली आहे. उत्पन्नाच्या बाबतीत, दोन्ही रेल्वेच्या तुलनेत पश्चिम रेल्वे प्रशासन हे मध्य रेल्वेपेक्षा खूप पुढे आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे होर्डिंगची माहिती मागितली होती. गौरव झा, मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक यांनी अनिल गलगली यांस मागील 5 वर्षात 7 जागांची माहिती दिली यात सन 2015-16 पासून वर्ष 2019-20 वर्षाची माहिती दिली.

मध्य रेल्वेने वर्ष 2015-16 मध्ये 5.92 कोटी, वर्ष 2016-17 मध्ये 5.98 कोटी, वर्ष 2017-18 मध्ये 6.60 कोटी, वर्ष 2018-19 मध्ये 9.23 कोटी आणि वर्ष 2019-20 मध्ये 11.35 कोटोची कमाई केली आहे.

पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य मंडळाचे अभय सानप यांनी अनिल गलगली यांना वर्ष 2015- 16 पासून 2019-20 या 5 वर्षाच्या कालावधीचा तपशील दिला आहे. सानप यांनी दावा केला की मागितलेली माहिती विस्तृत आहे म्हणून गलगली यांना कार्यालयात कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी बोलावण्यात आले होते.

पश्चिम रेल्वेने वर्ष 2015-16 में 33.15 कोटी, वर्ष 2016-17 मध्ये 35.77 कोटी, वर्ष 2017-18 मध्ये 40.01 कोटी, वर्ष 2018-19 मध्ये 40.18 कोटी आणि वर्ष 2019-20 मध्ये 54.48 कोटींची कमाई केली आहे.

अनिल गलगली यांच्या म्हणण्यानुसार बर्‍याच ठिकाणी वाटप केलेल्या जागेपेक्षा जागेचा अधिक वापर केला जातो, परंतु जोपर्यंत तक्रार येत नाही, तोपर्यंत अशी प्रकरणे समोर येत नाहीत. रेल्वे प्रशासनाने अशी माहिती आरटीआयच्या कलम 4 अन्वये ऑनलाइन करावी, जेणेकरून प्रत्येक नागरिकावर नजर ठेवता येईल. यासाठी विशेष पथक आवश्यक असून तक्रारीची प्रतीक्षा करण्याऐवजी अचानक पाहणी केल्यास अनियमितता उघडकीस येईल आणि रेल्वे प्रशासनाचा बुडणा-या महसुल वाचेल.

No comments:

Post a Comment