मुंबई महानगरात मेट्रोचे जाळे पसरविण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत मेट्रो लाईन 2 बी डी एन नगर ते मंडाळे यामधील कुर्ला स्टेशन वगळण्यात आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर ए राजीव यांस पत्र पाठवून कुर्ला स्टेशन न वगळण्याची मागणी केली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या तक्रारीनुसार मेट्रो लाईन 2 बी ही पश्चिम आणि पूर्व उपनगरांला जोडणारी असून कुर्ला स्टेशन हे महत्वाचे आहे. मेट्रो 2 बी चा DPR आणि निविदेत कुर्ला स्टेशन आहे पण आता हे स्टेशन वगळण्यात येत आहे. अन्य बीकेसी स्टेशन हे एकत्रित करण्यात येत आहे पण कुर्ला हे सरळसरळ वगळण्यात येत आहे. कुर्ला स्टेशन हे कुर्ला टर्मिनससाठी महत्वाचे आहे.
एमएमआरडीएचा हेतू खरोखरच प्रामाणिक असेल तर मग जाहीर नोटीस देऊन जनतेच्या सूचना, हरकती आणि आक्षेप का मागविले नाही? असा सवाल गलगली यांचा आहे. तसेच रेल्वे टर्मिनसला 2 बी मेट्रोची जोडण्यासाठी एमएमआरडीएने प्राधान्य का दिले नाही? ही चौकशीची बाब असून कुर्ला स्टेशन का वगळण्यात आले ही बाब अनाकलनीय आहे.
No comments:
Post a Comment