Saturday 12 March 2016

12 टोल नाका बंद आणि 53 नाक्यावर सूट- 798.44 कोटी रुपयाचा परतावा आणि नुकसान भरपाई

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद केलेले 12 आणि 53 नाक्यावर सूट दिल्यामुळे उद्योजकांस 798.44 कोटी रुपयाचा परतावा आणि नुकसान भरपाई दिल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांस कडे महाराष्ट्र राज्यात बंद केलेले टोल नाका आणि टोल टैक्स मधून सूट दिलेल्या टोल नाकाची माहिती मागितली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव शैलेंद्र बोरसे यांनी अनिल गलगली यांस कळविले की सार्वजनिक बांधकाम विभागातील 38 टोल नाक्यापैकी 11 टोल बंद केल्यामुळे 226.51 कोटी रुपये परतावा रक्कम आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचेकडील 53 टोल नाक्यापैकी 1 टोल नाका बंद झाला त्यासाठी परतावा रक्कम 168 कोटी रुपये आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरित 19 प्रकल्पावरील 27 टोल नाक्यांवर कार, जीप तसेच एसटी आणि स्कूल बसेसना टोल टैक्समध्ये सूट दिल्यामुळे उद्योजकास वर्ष 2015-16 करीताची भरपाई रक्कम 179.69 कोटी आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील 12 प्रकल्पावरील 26 टोल नाक्यांवर कार, जीप तसेच एसटी आणि स्कूल बसेसना टोल टैक्समध्ये सूट दिल्यामुळे उद्योजकास वर्ष 2015-16 करीताची भरपाई रक्कम 224.24 कोटी रुपये आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचेकडील 53 पैकी 1 टोल नाका बंद झाला. चंद्रपूर येथील रेल्वे ओव्हर ब्रिज तडाली (आरओबी) बंद झाला असून त्यासाठी एक रक्कमी 168 कोटी रुपये दिले गेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील 38 पैकी 11 टोल नाका बंद केले गेले त्यात अलिबाग-पेण-खोपोली, पुण्यातील मावळ येथील वडगाव-चाकण-शिक्रापूर प्रकल्पातील 2 टोल नाका, मोहोळ-कुरुळ-कामती-मंद्रुप, सोलापूर येथील टेंभूर्णी -कुर्डूवाडी-बार्शी लातूर वाडी, अहमदनगर करमाळा- टेंभूर्णी रस्ता, नाशिक-वणी रस्ता , भुसावळ येथील यावल फैजपूर रस्ता आणि खामगाव वळण रस्ता अशी नावे आहेत.

No comments:

Post a Comment