माहिती अधिकार कट्ट्याच्या 10 व्या वर्धापनादिनानिमित्त पुण्यात रंगली मैफल
सतत 10 वर्षे पुण्यात ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली संचालित माहिती अधिकार कट्ट्याच्या 10 व्या वर्धापनादिनानिमित्त पुण्यातील नवी पेठ येथील पत्रकार संघात मैफल रंगली. यावेळी माजी सनदी अधिकारी महेश झगडे, माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी एड प्रल्हाद कचरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, एड सुनील याहया, पत्रकार विनिता देशमुख उपस्थित होते.
लोकशाही, प्रशासन आणि माहितीचा अधिकार या विषयावर महनीय वक्त्यांनी आपल्या क्षेत्रातील अनुभवाच्या आधारावर उत्कृष्टपणे विश्लेषण केले. मुंबई उच्च न्यायालयात माहितीचा अधिकार आणि अंमलबजावणी यावर दाखल याचिकेवर दैदिप्यमान यश मिळवणारे एड सुनील याहया, यांस सन्मान प्रमाणपत्र देत गौरविण्यात आले. जम्मू कश्मीर येथून या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले मकबूल शेख यांनी आपले मनोगत मांडले. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, पीएमपी प्रवासी मंचाचे प्रमुख जुगल राठी,अफजल सिद्दीकी, डॉ अभिजित मोरे आणि स्थानिक स्तरावरील कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment