Friday 23 September 2016

14 वर्षे रखडलेल्या कुर्ला सबवेे चे काम डिसेंबर 2016 पर्यंत होईल पूर्ण

बहुप्रतिक्षित असा कुर्ला पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा असा कुर्ला सबवे चे काम डिसेंबर 2016 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे आणि पालिका प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली आहे. मध्य रेल्वेने 3.84 कोटी आतापर्यंत खर्च केले असून आता मध्य रेल्वे 2.11 कोटी आणि पालिका 2.94 कोटी असे 5.05 कोटी खर्च करत आहे.


कुर्ल्याचा सबवे चे काम हे गेल्या 14 वर्षापासून प्रलंबित आहे. पालिका आणि मध्य रेल्वेच्या समन्वयाच्या अभावी काम रखडलेले होते. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मध्य रेल्वे आणि पालिका प्रशासनाकडे या कामाबाबत माहिती विचारली होती. पालिकेचे कार्यकारी अभियंता (पूल) एफ.के.चव्हाण  यांनी अनिल गलगली यांस कळविले की कुर्ला सबवेची एकूण लांबी 129.90 मीटर, रुंदी 7.60 मीटर आणि उंची 2.60 मीटर इतकी आहे.  पालिका फक्त पश्चिमेकडील पोहोचमार्गाचे काम करणार असून त्याचा एकूण खर्च रु. 2 कोटी 94 लाख 88 हजार 383 आहे. हे काम करण्यासाठी मे.जे.एल.कंस्ट्रक्शन कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. काम सुरु करण्याची तारीख 15 फेब्रुवारी 2016 असून कामाचा कालावधी 9 महिन्याचा (पावसाळा वगळून) आहे.


मध्य रेल्वेचे सहायक कार्यकारी अभियंता ( कंस्ट्रक्शन) के.प्रभाकरण यांनी अनिल गलगली यांस कळविले की आतापर्यंत रेल्वेने रु. 3 कोटी 84 लाख 43 हजार रक्कम खर्च झाली आहे. सोलापूर येथील मेसर्स महेश रुपचंदाणी ने दिनांक 21 ऑक्टोबर 2014 रोजी काम सुरु केले असून दिनांक 31 डिसेंबर 2016 रोजी काम पूर्ण होईल.या सबवे चे काम मध्य आणि हार्बर रेल्वेच्या खालील भागात होत आहे.

अनिल गलगली यांच्या मते कोटयावधीचा खर्च करुनही गेल्या 14 वर्षापासून कुर्ला सबवे सुरु होऊ शकला नाही. कुर्ला सबवे सुरु होताच याचा लाभ हजारों पादचा-यांस होईल आणि रेल्वे दुर्घटनेत घट होण्यास मदत मिळेल, असा विश्वास अनिल गलगली यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment