भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेच्या मुख्य कार्यालयाच्या विस्तारीकरण व नूतनीकरणाच्या शुभारंभानिमित्त टर्मिनल–२ येथे आयोजित गणेश पूजन कार्यक्रम अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री गणेशाच्या विधिवत पूजनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी गणरायाचे आशीर्वाद घेऊन कार्यालयाच्या विस्तारीकरण व नूतनीकरणाच्या कामाला शुभारंभ केला.
या कार्यक्रमास प्रवीण दटके (आमदार व राष्ट्रीय अध्यक्ष – राष्ट्रीय एकजूट कामगार संघटना), आमदार प्रताप अडसड, सुधाकर देशमुख (माजी आमदार व मुख्य सल्लागार – राष्ट्रीय एकजूट कामगार संघटना) तसेच बलबीर सिंह (महासचिव – राष्ट्रीय एकजूट कामगार संघटना) यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मनोगतात संघटनेच्या कार्याचा आढावा घेत कामगारांच्या हितासाठी संघटना सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले.
यावेळी नगरसेवक अमित सरैया, संतोष धुरी, अभिजीत सामंत, अभिषेक राऊत, राहुल वाळंज, सरबजीत सिंह, दीपक कांदळगावकर, महेश पोळ तसेच राजेश घारे उपस्थित होते.
या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद वितरण करण्यात आले व संपूर्ण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
No comments:
Post a Comment