मुंबई – चेंबूर येथील बीजेपी सभागृहात रुग्ण मित्र साथी संस्था, अनिद्य कोचिंग क्लासेस, शौर्य बहुउद्देशीय सेवा संस्था (वर्धापन दिन) आणि प्रसन्न फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त अनोखा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेविका आशा मराठे, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे, रुग्ण मित्र विनोद साडविलकर आणि धनंजय पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन संस्था प्रमुख डॉ. छाया भटनागर, श्रद्धा अष्टीवकर आणि किरण साळवे यांनी केले. या प्रसंगी प्रशासकीय सेवेत कार्यरत तसेच रुग्ण मित्र साथी म्हणून समाजसेवा करणाऱ्या महिलांचा शाल, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
रुग्ण सहयोगी संस्थांचे प्रतिनिधी तसेच अनिद्य कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी किरण साळवे व डॉ. छाया भटनागर यांच्या कार्य अहवालाचेही प्रकाशन करण्यात आले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम उत्साहात व यशस्वीपणे संपन्न झाला.
No comments:
Post a Comment