Monday, 23 January 2017

बनावट नोटांची पक्की आकडेवारी आरबीआयकडे नाही

​नोटबंदी नंतर बनावट नोटांचा शोध लावणे सरळ होण्याचा सरकारी दावा आरबीआयने एका आरटीआयस दिलेल्या उत्तरानंतर फुस्स झाल्याची बाब झाली आहे. रद्द झालेल्या ज्या नोटां प्राप्त झाल्या आहेत त्यात बनावट नोटांची पक्की आकडेवारी उपलब्ध नसल्याची माहिती आरबीआयने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आरबीआयकडे माहिती विचारली होती की 8 नोव्हेंबर 2016 पासून 10 डिसेंबर 2016 पर्यंत ज्या बैंकेतून रद्द केलेल्या नोटांमधून किती बनावट नोटा से प्राप्त झाल्या आहेत. त्या बैंकेचे नाव, एकूण बनावट नोट, नोटांचे मूल्य आणि दिनांक याची माहिती दयावी. आरबीआयचे केंद्रीय जण सूचना अधिकारी पी. विजय कुमार यांनी अनिल गलगली यांस चलन व्यवस्थापन विभागाच्या बनावट नोट दक्षता विभागाकडून प्राप्त माहिती पुरविली. चलन व्यवस्थापन विभागाच्या बनावट नोट दक्षता विभागाने दावा केला आहे की मागितलेल्या माहितीची पक्की आकडेवारी भारतीय रिजर्व बैंकेकडे उपलब्ध नाही आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा 8 नोव्हेंबर , 2016 रोजी नोटबंदीचा निर्णय घेतला होता तेव्हा अभिमानाने सांगितले होते की यामुळे बनावट नोटा रोखण्यासाठी आणि दहशतवाद्यांस होणा-या अर्थ पुरवठ्यास संपविण्यास मदद होईल. परंतु आरटीआय अंतर्गत आरबीआयने दिलेले उत्तरामुळे स्पष्ट होत आहे की बनावट नोटांवर नियंत्रण राखण्यास सरकार अपयशी ठरले आहे किंवा नोटबंदीची घोषणा फुस्स झाली आहे, असे सांगत अनिल गलगली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांस आवाहन केले की लोकहितार्थ बनावट नोटांची माहिती आणि आकडेवारी सार्वजनिक करावी.

No comments:

Post a Comment