नोटबंदीनंतर फक्त ₹ 2000 मूल्याच्या नोटांचे मुद्रण केल्यानंतर झालेला गोंधळानंतर भारत सरकारने या सर्वात मोठ्या चुकीला सुधारण्याचे काम सुरु केले आहे. भारत प्रतिभूति मुद्रण आणि मुद्रा निर्माण निगम लिमिटेड सद्या फक्त ₹ 500 आणि त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटांचे मुद्रण करण्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली आहे. ₹ 500 च्या नवीन चलनाच्या नोटांच्या मुद्रणावर अंदाजे खर्च अजूनपर्यंत निश्चित केले नाही आहे.
आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांनी भारतीय रिजर्व बैंकेकडे नवीन चलनाबाबत सोबत जुन्या चलनाची विविध माहिती मागितली होती. यापूर्वी जुने चलन आणि नवीन चलन ₹ 2000 च्या मुद्रणाची माहिती दिली. अनिल गलगली यांचा अर्ज पी विजय कुमार यांनी भारत प्रतिभूति मुद्रण तथा मुद्रा निर्माण निगम लिमिटेड आणि भारतीय रिजर्व बैंक नोट मुद्रण प्राइवेट लिमिटेडेला आरटीआय एक्ट 2005 चे कलम 6(3) अंतर्गत हस्तांतरित केले. भारत प्रतिभूति मुद्रण तथा मुद्रा निर्माण निगम लिमिटेडचे जन माहिती अधिकारी के पी श्रीवास्तव यांनी अनिल गलगली यांचा अर्ज देवासचे बैंक नोट मुद्रणालय आणि नाशिकच्या चलार्थ पत्र मुद्रणालयास हस्तांतरित केले. गलगली यांचा अर्ज हस्तांतरित करत प्रतिपादन केले की सद्या भारत प्रतिभूति मुद्रण आणि मुद्रा निर्माण निगम लिमिटेडने एसपीएमसीआईएलच्या अंतर्गत असलेल्या प्रेस मध्ये ₹ 500 (नवीन) च्या चलनाच्या नोटा आणि त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटांचे मुद्रण केले गेले आहे. ₹ 500 च्या नवीन चलन नोटांचे मुद्रणावर अंदाजे खर्च अजून निश्चित केला गेला नाही.
अनिल गलगली यांनी याबाबत स्वागत करत प्रतिपादन केले की सरकार ₹ 2000 च्या अंदाजे 5 लाख कोटी नवीन चलनाच्या नोटांचे मुद्रण करुन संकटात सापडली. प्रत्यक्षात 8 नोव्हेंबर 2016 रोजी ₹ 500 आणि त्यापेक्षा कमी मूल्याच्या नवीन चलनाच्या नोटांच्या मुद्रणाची आवश्यकता होती. यामुळे सामान्य माणसांस रांगेत उभे राहणे आणि झालेल्या मृत्यूच्या घटनेपासून वाचवता आले असते.
No comments:
Post a Comment