Wednesday, 2 December 2015

कुलपती यांनी नेमलेल्या सर्च कमिटीला डॉ संजय देशमुख यांनी चक्क फसविले

एलएलबी परिक्षेत नापास झाल्यामुळे चर्चेत आलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय देशमुख यांनी कुलपती यांनी नेमलेल्या सर्च कमिटीला डॉ संजय देशमुख यांनी चक्क फसवित एलएलबी परिक्षेची माहिती लपविल्याची धक्कादायक वास्तव आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस राज्यपाल सचिव कार्यालयाने दिलेल्या कागदपत्रावरुन समोर आलेले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिव कार्यालयाकडे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय देशमुख यांनी कुलपती यांनी नेमलेल्या सर्च कमिटीला सादर केलेल्या बायोडाटाची माहिती मागितली होती. राज्यपाल सचिव कार्यालयातील जन माहिती अधिकारी यांनी अनिल गलगली यांस मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय देशमुख यांनी कुलपती यांनी नेमलेल्या सर्च कमिटीला सादर केलेल्या बायोडाटाच्या 118 पाने उपलब्ध करुन दिल्या आहेत. या कागदपत्राच्या छानणीत अनिल गलगली यांस आढळुन आले की 12 मे 2015 रोजी डॉ संजय देशमुख यांनी सर्च कमिटीचे नोडल ऑफिसर डॉ मधु चव्हाण यांस आपला बायोडाटा सादर केला होता. या बायोडाटात डॉ देशमुख यांनी तमिळनाडू येथील एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक प्रोफेसर डॉ एम एस स्वामीनाथन, एटॉमिक एनर्जी कमीशनचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर आणि एमिटी यूनिवर्सिटीचे कुलगुरु प्रोफ़ेसर डॉ विजय खोले यांची शिफारस सुद्धा संलग्न केली होती. 5 जानेवारी 2005 रोजी जीव शास्त्र विभागात प्रोफ़ेसर या नात्याने नियुक्त झालेल्या डॉ संजय देशमुख यांनी ग्रेजुएशन, पोस्ट ग्रेजुएशन आणि पीएचडी पर्यंतची सर्व माहिती व्यवस्थित दिली पण एलएलबी परिक्षेची माहिती न देता सर्च कमिटीची दिशाभूल केली. डॉ संजय वसंत देशमुख यांनी एलएलबी या पदवी शिक्षणक्रमाच्या सत्र-1 च्या ऑक्टोबर/ नोव्हेंबर, 2014 मध्ये घेतलेल्या परिक्षेसाठी अर्ज दाखल केला होता पण ते परिक्षेस प्रविष्ठ झाले नाहीत.तसेच ते या शिक्षणक्रमाच्या सत्र-2 च्या एप्रिल/मे, 2015 मध्ये घेतलेल्या परिक्षेस प्रविष्ठ झाले होते, ही सत्य आणि वस्तुस्थिती सर्च कमिटी समक्ष ठेवणे आवश्यक असताना ती लपविल्याचा आरोप करत अनिल गलगली यांच्या मते ही चक्क फसवणूकच आहे. जेव्हा कोणताही उमेदवार अर्ज दाखल करतो तेव्हा त्यास आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या माहितीबरोबर सद्यस्थितीला घेत असलेल्या शिक्षणाची माहिती देणे बंधनकारक असते पण डॉ संजय देशमुख यांनी एलएलबी परिक्षेची माहिती का लपविली? हा सर्वात मोठा प्रश्न असून ते एलएलबी नापास झाल्यानंतर त्या परीक्षेचे रहस्य बाहेर आले. मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव असलेल्या राज्यपाल सी विद्यासागर राव यांस पाठविलेल्या पत्रात अनिल गलगली यांनी एलएलबी परिक्षेची माहिती लपवित सर्च कमिटीची फसवणुक करणा-या डॉ संजय देशमुख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सर्च कमिटीची दिशाभूल करुन एलएलबी परिक्षेची माहिती लपविणा-या डॉ संजय देशमुख यांस कुलगुरु पदावरुन हटवित योग्य आणि सक्षम व्यक्तीची कुलगुरु पदावर नेमणूक करण्याची मागणी अनिल गलगली यांनी सरतेशेवटी केली आहे.

No comments:

Post a Comment