दि इंस्टिट्यूट ऑफ़ इंडियन चार्टर्ड अकाउंटेंट ऑफ़ इंडिया या चार्टर्ड अकाउंटेंट संस्थेने नोटबंदीवर आपले मत मांडण्यास सदस्यांस मनाई केली होती याबाबीचा गौप्यस्फोट ट्विटर वर आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली करताच संस्थेने गलगली यांच्या ट्विटर खात्यास ब्लॉक करत पळ काढला.
दि इंस्टिट्यूट ऑफ़ इंडियन चार्टर्ड अकाउंटेंट ऑफ़ इंडिया या चार्टर्ड अकाउंटेंट संस्थेने जारी केलेले सदस्यांस पत्र आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ट्विटर प्रकाशित करत याप्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले. गलगली यांच्या ट्विट नंतर ते वायरल झाले आणि सर्व स्तरातून नकारात्मक प्रतिक्रिया येताच संस्थेस आपली चूक लक्षात आली. अनिल गलगली यांच्या प्रत्यक्ष ट्विट नंतर चार्टर्ड अकाउंटेंट यांनी सुद्धा या प्रकाराचा प्रचंड विरोध केला. ज्या गलगली यांच्या एका ट्विट मुळे हा सर्व प्रकार घडला त्या गलगली यांच्या ट्विटवर हँडलला दि इंस्टिट्यूट ऑफ़ इंडियन चार्टर्ड अकाउंटेंट ऑफ़ इंडिया या चार्टर्ड अकाउंटेंट संस्थेने ब्लॉक केले. त्यानंतर संस्थेने आपल्या साईटवरुन ते आक्षेपदायक पत्र काढून टाकले. अनिल गलगली यांच्या मते नोटबंदीच्या बाबतीत सामान्य नागरिक सर्वप्रथम चार्टर्ड अकाउंटेंट यास संपर्क करतो. एक व्यवासायिक होण्यापूर्वी या भारताचा नागरिक या नात्याने चार्टर्ड अकाउंटेंट यांस आपले विचार मांडण्याचा अधिकार जो घटनेने दिलेला आहे तो हिरावून घेण्याचा प्रकार दि इंस्टिट्यूट ऑफ़ इंडियन चार्टर्ड अकाउंटेंट ऑफ़ इंडिया ही चार्टर्ड अकाउंटेंट संस्था करत असल्याचा आरोप अनिल गलगली यांनी केला आहे. राजकारणी नेहमीच आरोप करतात की कर चुकविणा-या लोकांस चार्टेड अकाउंटंट मदत करतात आणि आता हेच चार्टेड अकाउंटंट राजकारण्याची तळी उचलताना दिसत आहेत.
No comments:
Post a Comment