यशस्वी सामाजिक कार्य करताना वेगवेगळे नियम आणि धोरणाचा वापर करत जलद गतीने माहिती मिळविणे आणि चांगल्या समाजासाठी त्याचा वापर करावा. आरटीआयचा वापर सामाजिक कारणासाठी करण्यावर भर दयावा,असे प्रतिपादन आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मनी फाऊंडेशन तर्फे आयोजित चर्चासत्रात केले.
मनी फाऊंडेशन तर्फे आयोजित चर्चासत्रात अनिल गलगली यांनी माहितीचा अधिकार म्हणजे आरटीआय बाबत विविध पैलूचा उलगडा केला. आरटीआय पेक्षाही अधिक बळकट आणि सामान्यांस न्याय देण्यासाठी शासनातर्फे चालना देणारी लोकशाही दिन असो अथवा लोकायुक्तांचा कडे न्याय मागण्याची प्रक्रिया असो, याचाही वापर करत राजकीय आणि यंत्रणेमधील दोष आणि भ्रष्ट कारभार खणून काढण्याची गरज असल्याचे गलगली यांनी सांगितले. आरटीआय बाबत आजही जो गैरसमज राजकीय नेते आणि प्रशासनिक अधिकारी यांच्या मार्फत पसरविला जात आहे त्यामुळे जनमानसात जी प्रतिमा मलीन होत आहे ती सुधारण्यासाठी आरटीआय कार्यकर्त्याने अधिक जोमाने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. माहिती संपूर्ण घेतल्यानंतरच त्यावर अचूक कार्यवाही करण्यासाठी संबंधित मंत्रालय किंवा अधिका-यांस पत्रव्यवहार केल्यास निश्चितपणाने कार्यवाही होते आणि आरटीआयचे महत्त्व उजळून येते. अनिल गलगली यांनी हेमा मालिनी, पालिकेतील विशेष कार्यकारी अधिकारी नेमणुका, एकनाथ खडसे बंगला प्रकरण अश्या प्रकरणाची माहिती दिली . तसेच खासदार, आमदार, मंत्री पद भूषविणारे लोकप्रतिनिधी यांस कायदा आणि नियमांची माहिती नसल्याबद्दल खंत सुद्धा व्यक्त केली.
या चर्चासत्रात मनीलाईफ मॅगझीनच्या व्यवस्थापकीय संपादक सुचेता दलाल यांनी अनिल गलगली यांस पुष्पगुच्छ देत आभार मानले तसेच उप संपादक योगेश सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले.
No comments:
Post a Comment