Friday, 23 December 2016

महाराष्ट्र शासनाच्या जाहिरातीत कार्यक्रमाची वेळ दिलीच नाही

शासनाने कोटयावधी रुपयांची दिलेली जाहिरात निष्प्रभ ठरली जेव्हा त्या जाहिरातीत कार्यक्रमाची वेळ न कळवण्याची अक्ष्यम चूक झाली. शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत शिवस्मारक जलपूजन आणि भूमिपूजन सोबत गतिवान मुंबईची जाहिरातीतील चूक आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी शासनाच्या लक्षात आणून दिली आहे.

शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत होणा-या शिवस्मारक जलपूजन आणि भूमिपूजन सोबत गतिवान मुंबईची जाहिरात शनिवारी सर्वच वर्तमानपत्रासोबत टीवीवर झलकत होती. एमएमआरडीए मैदानात पंतप्रधान मोदी यांचा भव्य दिव्य कार्यक्रम सुद्धा असून मुंबईकरांस या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात जाहिरातीत कोठेही कार्यक्रमाची वेळ न दिली असल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. या सर्वच जाहिरातीत पदोपदी महाराष्ट्र शासन आणि एमएमआरडीएचा उल्लेख असल्यामुळे जबाबदार शासकीय यंत्रणेकडून इतकी मोठी चूक कशी झाली असावी? असा प्रश्न अनिल गलगली यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment