बीकेसी येथील एमसीए मैदानाचे नामकरण शरद पवार क्रिकेट अकादमी असे केले गेले असून या नामकरणास एमएमआरडीए प्रशासनाने कोणतीही परवानगी न दिल्याची माहिती एमएमआरडीए प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली आहे.
बीकेसी येथील शैक्षणिक प्रयोजनासाठी राखीव असलेला भूखंड एमएमआरडीए प्रशासनाने मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे एमसीए यांस दिला. या भूखंडावर क्रिकेट कमी आणि अन्य उद्योग धंदे सुरु असल्यामुळे एमएमआरडीए प्रशासनाने 3 जून 2015 रोजी एमसीए यास नोटीस जारी केली आहे. अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाला याबाबत माहिती विचारली असता भूमी आणि मिळकत विभागाने तो अर्ज नगर व क्षेत्र नियोजन विभागाकडे हस्तांतरित केला. नगर व क्षेत्र नियोजन विभागाने अनिल गलगली कळविले की 'आरजी 2' ही 'जी ब्लॉक' मधील जागा मुंबई क्रिकेट असोसिएशन यास वाटप केली असून या भूखंडास/ जमीनीस 'शरद पवार स्टेडियम क्रिकेट अकादमी असे नामकरण करण्याची विनंती या विभागास प्राप्त झाली नाही व या विभागाकडून अशी परवानगी दिली नाही. अनिल गलगली यांनी अश्या प्रकारचे दिलेल्या नावाबाबत आश्चर्य व्यक्त करत रीतसर परवानगी न घेतल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस केली आहे. मीडिया रिपोर्टच्या आधारावर जशी सुब्रतो रॉय यांचे नाव पुणे येथील क्रिकेट स्टेडियमला देताना 100 कोटीहून अधिक रक्कम वसूल केली गेली होती तशी रक्कम एमसीएकडून वसूल करण्याची मागणी गलगली यांची आहे.
No comments:
Post a Comment