मुंबई पालिका रस्ते कामातील घोळ आणि भ्रष्टाचार प्रकरणी दाखल गुन्ह्याबाबत पोलीसांच्या तपासावर लोकआयुक्त आणि माजी न्यायमूर्ति मदनलाल तहिलयानी समाधान व्यक्त केले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात 26 लोकांस अटक केली असून प्रकरणाशी संबंधित अन्य लोकांची अटक लवकरच करण्यासाठी तपास सुरु असल्याची माहिती दिली.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ज्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांस पुन्हा मुंबईतील 4 कामाचे कंत्राट दिल्याबद्दल लोकआयुक्त माजी न्यायमूर्ति मदनलाल तहिलयानी यांस तक्रार केली होती. यापूर्वी लोकआयुक्त यांच्या आदेशानंतर पालिकेच्या दोषी अधिका-यांस मुंबई पोलीसांनी अटक केली. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत पोलीस तपास योग्य दिशेने होत असल्याचे सांगत तहिलयानी यांनी रस्त्यांच्या कामातील साम्रगीचे नमूने बाबत पोलीसांस विचारणा केली. तपास अधिकारी विजय वाघमारे यांनी सांगितले की आयआयटी कडे नमुन्यासाठी संपर्क साधला आहे. पोलीसांनी अजुन ज्यांस अटक करावयाची आहे त्यांची यादी लोकआयुक्तांस दाखविली. लोकआयुक्त तहिलयानी यांनी तपास योग्य दिशेने होत असल्याचे सांगत अनिल गलगली यांची तक्रार बंद केली. यावेळी पालिकेतर्फे संचालक लक्ष्मण वटकर, मुख्य अभियंता एस ओ कोरी, संजय दराडे, तक्रारदार अनिल गलगली उपस्थित होते.
No comments:
Post a Comment