Friday, 12 August 2016

3 मिनिटात 'मिडास टच' भरतो खड्डा

मुंबई महानगरपालिका रस्त्यांवरील खड्डे आणि खड्डयातील रस्त्यांमुळे नेहमीच वादात राहिली आहे.या खड्डयांच्या कटकटीतून बाहेर पडण्यासाठी एका नवीन तंत्रज्ञानाचा प्रायोगिक तत्वावर केलेला प्रयोग सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवर सफल झाला असून फक्त 3 मिनिटात ऑस्ट्रियाचा मिडास टच खड्डा भरतो ते सुद्धा भर पावसात आणि खड्डयांच्या डबक्यात ही. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवर गुरुवारी संध्याकाळी पालिकेच्या पूल विभागाचे मुख्य अभियंता एस ओ कोरी यांच्या सोबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी या प्रात्यक्षिकात भाग घेतला. इको ग्रीन इंफ्रास्ट्रक्चर एंड डेवलपमेंट प्राइवेट लिमिटेड कंपनीच्या अधिका-यांनी 3 ठिकाणी असलेले खड्डे अवघ्या 9 मिनिटात बुझविले आणि ते सुद्धा वाहतूक न थांबविता. खड्डे बुझविताच भरधाव गाडी धावू शकते आणि याची गारंटी 2 ते 3 वर्ष आहे. रिएक्टिव अस्फाल्ट असलेले मिडास टच उत्पादन 80 रुपये किलो असून एका चौरस मीटरच्या 10 एमएम खड्डयांसाठी 25 किलो मिडास टच आवश्यक आहे.अनिल गलगली यांच्या मते अश्या तंत्रज्ञानाचे उपयोग आवश्यक असून पालिका प्रशासनाने यावर भर दयावा.जेणेकरुन मुंबई खड्डेमुक्त होईल.

No comments:

Post a Comment