महाराष्ट्रातील जनतेसाठी आरोग्य सेवा सरकारी पातळीवर आरोग्य सेवेचे बाजारीकरण होत असून आता सरकार खाजगीकरणाकडे वळत आहे. या खाजगीकरणाचा विरोधात जागतिक आरोग्य दिनानिमित्त ठाण्यात मोर्चा काढण्यात आला.
लोकजागृती सामाजिक संस्थेतर्फे शिवाजी मैदान, तलावपाळी पासून सिव्हिल रुग्णालय वाया जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. संस्थेच्या अध्यक्ष स्वाती पाटील, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, डॉ श्रीकृष्ण ढोणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील आणि सिव्हिल सर्जन डॉ केम्पी पाटील यांची भेट घेत निवेदन सादर केली. आंदोलनात शासनाच्या त्या परिपत्रकाचा विरोध केला ज्यात 300 खाटयांच्या सरकारी रुग्णालयाचे खाजगीकरण करण्याचे संकेत दिले आहे. शासनाने 3 सदस्यीय समितीची स्थापना करत अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत.
यावेळी विनोद साडविलकर (सीडीएफ मुंबई), राजीव कदम, वीणा दळी, रजनी ढोणे, विश्वनाथ सावंत, चंद्रकांत यादव, प्रकाश वाघ, जितेंद्र तांडेल, अविनाश कदम, श्रेया निमोणकर, मिलिंद निमोणकर, कमला राव, श्रुती गमरे, सुखबीर कौर, संदीप पाटील, भरत खरे, राजू शेळके आणि अन्य आरोग्य चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment