मुंबई महानगरपालिका प्रशासनाने काळबादेवी आगीनंतर आगीच्या प्रसंगी आवश्यक उपकरणांसाठी पालिकेची तिजोरीतील पैसा मुंबई अग्निशमन दलास देताना उदारपणा दाखविला. 6 प्रकारच्या उपकरणांसाठी 59 कोटी गेल्या 3 वर्षात खर्च केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे काळबादेवी आगीनंतर मुंबई अग्निशमन दलाने आगीच्या प्रसंगी ज्या उपकरणांची आवश्यकता असते व जी खरेदी केली आहे, त्याबाबत माहिती मागितली होती. मुंबई अग्निशमन दलाचे विभागीय अग्निशमन अधिकारी एस. डी. सावंत यांनी गलगली यांस कळविले की 22 नग लाईट पोर्टेबल पंप विकत घेतले असून त्याची किंमत 3 कोटी 41 लाख 35 हजार 358 रुपये आहे. एलईडी इमरर्जन्सी लाईट चे 35 नगाची किंमत 95 लाख 76 हजार 840 रुपये आहे. 42 कोटी 45 लाख 64 हजार 114 किंमतीचे 17 क्विक रिस्पॉन्स वाहनांचे नग आहेत. 06 नग आगीचे बंब असून त्याची किंमत 3 कोटी 63 लाख 11 हजार 827 रुपये आहे. हाय प्रेशर पंप 05 नग असून 62 लाख 43 हजार 14 रुपये इतकी किंमत आहे तर 14 किलो लिटर वॉटर टँकर चे 11 नग विकत घेतले असून त्याची किंमत 7 कोटी 94 लाख 81 हजार 745 रुपये आहे.
अनिल गलगली यांच्या मते मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ज्या पद्धतीने भरीव निधी देत सर्व प्रकारच्या उपकरणांची आवश्यकता पूर्ण केली आहे. आता मुख्य अग्निशमन अधिकारी आणि अन्य अधिका-यांनी जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता आहे.
No comments:
Post a Comment