मुंबई शहर आणि उपनगरात वाढणाऱ्या साईबर क्राईम बाबत महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांस माहिती देण्यासाठी साकीनाका विभागातील सफेदपूल येथील ईडन हाईस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे सायबर क्राईम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी आणि विद्यार्थीनी सायबर क्राईमचे धडे घेतले.
या कार्यशाळेत सायबर क्राईमचे तज्ञ विक्रम पवार यांनी विविध पैलूवर प्रकाश टाकत यापासून बचावात्मक बाबींचे प्रशिक्षण दिले. साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी यूपीएससी आणि एमपीएससी बाबत मार्गदर्शन करत सायबर क्राईमची माहिती जाणून घेण्याची आवश्यकता सांगितली. यावेळी प्राचार्य रवी नायर, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, एनसीपी चांदीवली तालुका अध्यक्ष बाबू बतेली, कैलास आगवणे, नंदू साळुंखे, जगदीश कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment