महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव असलेले स्वाधीन क्षत्रिय कसे प्रामाणिक आहे? याची प्रचिती बेस्टच्या महाव्यवस्थापकांसाठी राखीव असलेल्या निवासाचे भाडे आणि वीज देयकाची लाखांची रक्कम अदा केल्यानंतर आली आहे. मुख्य सचिव असतानाही बेस्टच्या निवासाचा वापर करताना भाडे आणि वीज देयकाची एकूण रक्कम 5 लाख 62 हजार 780 रुपये आणि 56 पैसे असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस बेस्ट प्रशासनाने दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस बेस्ट प्रशासनाकडे बेस्टचे महाव्यवस्थापक नसताना स्वाधीन क्षत्रिय यांनी बेस्ट महाव्यवस्थापक यांच्यासाठी राखीव असलेले निवास वापरण्याबाबत माहिती विचारली होती. बेस्ट प्रशासनाचे जन माहिती अधिकारी आणि मुख्य अभियंता ( स्थापत्य) यांनी अनिल गलगली यांस कळविले की महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये स्वाधीन क्षत्रिय यांस दिनांक 27 जून 2006 ते 9 मे 2010 आणि 31 जानेवारी 2011 ते 31 मार्च 2015 या दरम्यान निवासस्थान देण्यात आले होते. स्वाधीन क्षत्रिय यांनी वीज देयकापोटी 3 लाख 95 हजार 58 रुपये आणि 56 पैसे अदा केले तसेच भाड्यापोटी 1 लाख 68 हजार 722 रुपये अदा केले आहे. बेस्ट महाव्यवस्थापकासाठी राखीव असलेल्या निवासस्थानाचे क्षेत्रफळ 530 चौरस मीटर आहे. इलेक्ट्रिक हाऊससाठी असलेल्या जलजोडणीतून बेस्टच्या महाव्यवस्थापकाच्या निवासाला पाणीपुरवठा करण्यात येतो.
मुख्य सचिव असताना रत्नाकर गायकवाड यांनी एमएमआरडीए निवासाचे वीज आणि पाणी देयके अदा करण्यास नकार दिला होता याउलट स्वाधीन क्षत्रिय यांनी पदाचा दुरुप्रयोग न करता जी रक्कम होती ती कोणताही गाजावाजा न करता अदा केली आहे. गायकवाड यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्य सचिवाना मंत्री आणि राज्यमंत्री धर्तीवर निवासस्थान मोफत पाणी, वीज आणि भाडेरहित करण्यात आले होते.
No comments:
Post a Comment