मुंबई मेट्रोच्या घाटकोपर स्टेशन येथील प्लेटफार्म क्रमांक 2 फार दिवसापासून
बंद असल्याचा फटका प्रवाश्यांना बसला असून मेट्रो कंपनीचे ढिम्म प्रशासन कोणतीही
कारवाई करत नाही. एकाच प्लेटफार्मवरुन गाडीची ये-जा सुरु आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई मेट्रो आणि
एमएमआरडीए प्रशासनाला ट्वीट करत प्रवाश्यांना होणा-या त्रासाची तक्रार केली आहे. घाटकोपर
येथील मेट्रोचा एकच प्लेटफार्म क्रमांक 1 सुरु आहे. दूसरा प्लेटफार्म क्रमांक 2 बंद आहे. ज्याचा
परिणाम गर्दीवर होत आहे. अनिल गलगली यांनीे या प्लेटफार्मला ताबडतोब सुरु करण्याची
मागणी केली आहे. जेणेकरून प्रवाश्यांना होणारा त्रास कमी होईल. खरे पाहिले तर
घाटकोपर हे मेट्रोचे प्रथम स्टेशन असताना मेट्रो कंपनी याबाबीकडे दुर्लक्ष करत आहे.
No comments:
Post a Comment