Tuesday, 6 September 2016

सर जे जे कला महाविद्यालयास प्राध्यापक आणि अधिव्याख्यातेची भासते चणचण



महाराष्ट्रात कलेचे जतन करण्याचे पवित्र कार्य मुंबईतील ज्या सर जे जे कला महाविद्यालयात होते तेथे कला संचालकाचे दुर्लक्ष असल्याचा परिणाम कलेवर होत आहे.  सर जे जे कला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि अधिव्याख्यातेच्या एकूण 44 पैकी 33 पदे रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाविद्यालय प्रबंधक अलका चव्हाण यांनी दिली आहे. प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर,अमोल पालेकर, अरुधंती रॉय ते राज ठाकरे यांस ज्या जेजे वृक्षाच्या कुशीतून उदयास आले तेथे प्राध्यापक आणि अधिव्याख्यातेची चणचण भासणे ही बाब दुर्दैवाची आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सर जे जे कला महाविद्यालयाकडे एकूण शिक्षकांची पदे आणि रिक्त पदाची माहिती मागितली होती. सर जे जे कला महाविद्यालयाच्या जन माहिती अधिकारी आणि प्रबंधक अलका चव्हाण यांनी माहिती देत कळविले की प्राध्यापकाची 8 पैकी 7 आणि अधिव्याख्याताची 36 पैकी 26 पदे रिक्त आहेत. तसेच हंगामी अधिव्याख्याता आणि कंत्राटी अधिव्याख्याता याची प्रत्येकी 6-9 पदे पर्यायी व्यवस्था म्हणून कार्यरत आहेत. सर जे जे कला महाविद्यालयात हंगामी शिक्षक( अधिव्याख्याता ) हे पद वर्ष 1993 पासून कार्यरत आहेत. परंतु वर्ष 1993 मध्ये न्यायालयीन निर्णयानंतर हंगामी अधिव्याख्याता हे पद 1997 पासून नियमितपणे कार्यरत आहे. प्राध्यापक आणि अधिव्याख्याता पद भरण्याची जबाबदारी बाबत गलगली यांनी विचारले असता ही जबाबदारी कला संचालक, कला संचालनालय यांची असल्याची माहिती देण्यात आली.
अनिल गलगली यांनी कला संचालकाच्या अश्याप्रकारच्या दुर्लक्षपणाकडे आश्चर्य व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस लिहिलेल्या कला संचालकावर कार्यवाहीची मागणी करत ताबडतोब रिक्त पदे भरण्यासाठी कला संचालकास आदेश जारी करण्याची मागणी केली आहे. कलेस वाव देण्यासाठी महाराष्ट्र शासन धडपडत असताना अशी नकारात्मकता त्यास अयशस्वी करण्यास कारणीभूत ठरते, असे गलगली यांनी नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment