Thursday, 24 March 2016

पंतप्रधान मोदीच्या सभेवर एमएमआरडीएने खर्च केले 3.37 कोटी रुपये

पंतप्रधान नरेंद्र मोदीची प्रत्येक सभा आणि दौरा विशेष असतो. मागील वर्षी ऑक्टोबरमधील मुंबई भेटीवर असलेले मोदी यांच्या काही तासाच्या सभेसाठी एमएमआरडीएने 3.37 कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवार,11 ऑक्टोबर 2015 रोजी एमएमआरडीए मैदानात आयोजित सभेच्या एकूण खर्चाची माहिती मागितली होती.एमएमआरडीए प्रशासनाने या सभेवर एकूण 3 कोटी 36 लाख 81 हजार 366 रुपये खर्च झाल्याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाटरप्रूफ एलुमिनियम आणि टरर्पौलिन मंडप मेसर्स प्रताप डी टकाक्कार एंड कंपनी यांनी बांधले होते ज्यावर 93 लाख 35 हजार 70 रुपये खर्च करण्यात आले. मेसर्स जेस आइडियाज प्राइवेट लिमिटेड कंत्राटदारांने चेयर्स, टेबल्स,सोफास, पोडियम,कारपेट,टीपोय्स,केमिकल टॉयलेट,गेट,बर्रिक्टेस,रेलिंग,क्लोथ पार्टीशन,फ्लावर डेकोरेशन आणि पिण्याच्या पाण्यावर 1 कोटी 12 लाख 97 हजार 104 रुपये खर्च केले तर इलेक्ट्रिकल सिस्टम, विडियो हॉल आणि रिले अरेंजमेंटवर 71 लाख 67 हजार 465 रुपये मेसर्स श्री कंस्ट्रक्शन या कंत्राटदारांस खर्च आला. जाहीरातीवर 20 लाख 85 हजार 647 इतकी रक्कम खर्च झाली तर जमीन एमएमआरडीए प्रशासनाची असल्यामुळे कोणताही खर्च आला नाही. 73,500 चौरस मीटर सभेसाठी आणि 36,500 चौरस मीटर वाहनतळासाठी आरक्षित करण्यात आले होते. मेट्रो लाइन आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल या संयुक्त कार्यक्रमासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेत 3000 ब्राऊचर्स बनविले असून एका ब्राऊचर्सवर 111 रुपयांचा खर्च आला. यावर एकूण 3 लाख 33 हजार 900 रुपये खर्च झाले. तर पोडियम लोगो, बैनर्स, स्टेज बैक ड्राप,वेलकम, डायरेक्शन आणि थैंक यू बोर्ड साठी 34 लाख 62 हजार 180 रुपये खर्च झाले. एमएमआरडीए प्रशासनातील अभियांत्रिकी विभाग नेहमीच विकास योजनेच्या खर्चात अतिरिक्त रक्कम वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात असे पण सभेची साधी माहिती देण्यासाठी 5 महिन्याचा लागलेला विलंब चकित करणारा आहे. अनिल गलगली यांच्या मते काही तासासाठी इतकी मोठी रक्कम खर्च केली जात आहे. राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती आणि पैसाची टंचाई पाहता राज्य शासनाने भूमिपूजन कार्यक्रम आटोपल्यानंतर कोटयावधी रुपये खर्च करून जाहीर सभा घेण्याचे टाळावे हवे होते, असे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment