बहुप्रतिक्षेनंतर सुरु झालेला कुर्ला सबवेमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून यात आता सीसीटीव्ही बसविण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना कुर्ला एल विभागाचे सहायक पालिका आयुक्त अजितकुमार अंबि यांनी दिली आहे. तसेच या सबवेतील लिकेज बाबतीत पालिकेच्या पूल विभाग कार्यवाही करणार आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी कुर्ला सबवे बाबत लिकेज, सीसीटीव्ही आणि अन्य बाबतीत पालिका आयुक्त अजोय मेहता यांस पत्र पाठवून कार्यवाही करण्याची मागणी केली होती. अनिल गलगली यांच्या पत्रानंतर अजितकुमार अंबि, सहायक आयुक्त यांनी अनिल गलगली यांस कळविले की सीसीटीव्ही बसविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे आणि लिकेज दुरुस्ती पूल विभाग करील. कुर्ल्याचा सबवे चे काम हे गेल्या 14 वर्षापासून प्रलंबित होते. पालिका आणि मध्य रेल्वेच्या समन्वयाच्या अभावी काम रखडलेले होते. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सतत केलेल्या पाठपुराव्यानंतर कुर्ला सबवे सुरु करण्यात आला. या सबवेची एकूण लांबी 129.90 मीटर, रुंदी 7.60 मीटर आणि उंची 2.60 मीटर इतकी आहे. सबवे चे काम मध्य आणि हार्बर रेल्वेच्या खालील भागातून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment